काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध, मनसेचा ‘सामना’ अग्रलेखावर पलटवार

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पलटवार केला आहे (MNS on Saamana Editorial about Raj thackeray).

काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध, मनसेचा 'सामना' अग्रलेखावर पलटवार
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 5:11 PM

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पलटवार केला आहे (MNS on Saamana Editorial about Raj Thackeray). मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सामनाच्या अग्रलेखात राज ठाकरेंच्या सूचनेचा विपर्यास झाल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर काही लोकांना राजद्वेषाचा मूळव्याध झाल्याची जहरी टीका देशपांडेंनी केली. संदीप देशपांडेंनी थेट सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. आज (25 एप्रिल) सामनाच्या अग्रलेखात राज ठाकरेंच्या महसूल वाढवण्यासाठी दारुविक्री सुरु करण्याच्या सूचनेवर अनेक उपरोधात्मक टोले लगावले होते. त्यावर मनसेने ही प्रतिक्रिया दिली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “अख्खा महाराष्ट्र सध्या कोरोनाशी लढतो आहे. यात सर्वच लोक महाराष्ट्र सरकारला सहकार्य करत आहेत. राज ठाकरेदेखील वेळोवेळी राज्य सरकारला योग्य त्या सूचना देत होते. राज्य सरकारनेही बऱ्याचदा त्याची दखल घेतली आहे. याआधीदेखील त्यांनी कोरोनाशी संबंधित सकारात्मक बातम्या प्रकाशित व्हाव्यात आणि त्याची आकडेवारी समोर यावी अशी सूचना केली होती. त्याचीही दखल राज्य सरकारने घेतली होती. यानंतर राज ठाकरे यांनी महसुलाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांना एक पत्र पाठवलं होतं. यावर सामनावीर संजय राऊत यांनी एक अग्रलेख लिहिला आहे.”

मला वाटतं राज ठाकरे यांच्या सुचनेचा मुळ गाभा राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल हा आहे. मात्र त्याचा विपर्यास करुन सध्या चर्चेत नसलेले संजय राऊत यांनी तो लेख लिहिला असावा. अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना देण्याचं विरोधीपक्षाचं काम करत असताना असा अग्रलेख येणं म्हणजे राज द्वेषाचा काही लोकांना मुळव्याध झाला आहे. त्यामुळे आम्ही याला गांभीर्याने घेत नाही, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

‘सामना’मध्ये नेमकं काय म्हटलंय?

राज ठाकरे यांनी ही जी रंगीत संगीत मागणी केली, त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की तळीरामांच्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसे प्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? असा प्रश्नही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रावरुन पहिल्यांदाच सामनाच्या (MNS on Saamana Editorial about Raj thackeray) संपादकीयमध्ये राज ठाकरे यांच्या फोटोसह लेख छापण्यात आला आहे. “राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करुन मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर,” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“लॉकडाऊनमुळे फक्त वाईन शॉप बंद आहे असे नाही, तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे हे कारखाने सुरु करावे लागतील. हा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरु होऊन दारुचा महसूल मिळत नसतो,” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हेही वाचा : महसुलासाठी वाईन शॉप्स सुरु करा, राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“जर दारुचे कारखाने सुरु करायचे म्हणजे कामगारांची गर्दी आणि वाईन शॉप सुरु करायचे म्हणजे अक्षरश: रेटारेटी आणि हाणामारी. लोक भाजी, अन्न धान्य वैगरे शिस्तीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून घेत आहेत. पण वाईन शॉपबाहेर रांगा लागतील तेव्हा काय नजारा असेल, त्याची कल्पनाच करवत नाही. अनेक दिवसांचा उपवास संपवून लोकं दारु खरेदीसाठी बाहेर पडतील तेव्हा अनेकांची अवस्था ही भुकेल्या लांडग्यासारखी असेल.” असेही अग्रलेखात म्हटलं आहे.

“गेल्या 35 दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात चोऱ्या-माऱ्या दरोडे असे गुन्हे घडले नाही. पण मुंबई ठाणे आणि अन्यत्र जे काही दरोडे पडले ते वाईन शॉपवरच. जी लुटमार झाली ती वाईन शॉपचीच,” असेही सामनाच्या अग्रलेखात स्पष्ट करण्यात आले (Saamana Editorial Criticizes Raj thackeray)आहे.

संबंधित बातम्या : 

व्वा! राज बाबू!!, सामनाचा अग्रलेख, राज ठाकरेंचा फोटोही छापला

मला राजचीही साथ, उद्धव ठाकरेंकडून एकजुटीचा उल्लेख

मद्यविक्री दुकानांबाबत काटेकोरपणे नियमावली तयार करणार : राजेश टोपे

MNS on Saamana Editorial about Raj thackeray

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.