लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनचे सरकारकडे कसलेच नियोजन नाही, मनसेची टीका
राज्य सरकारकडे कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)
कल्याण : राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत राज्यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभरात लॉकडाऊनमध्ये काही शिथिलता देण्यात आल्यामुळे मुंबईत बेस्ट बस सुरु झाल्या आहेत. तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. तर मरिन ड्राईव्ह आणि चौपट्यांवर गर्दी होतानाचं चित्र आज ठिकठिकाणी पाहायला मिळालं. यावरुन राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या एक्झिट प्लॅनवर मनसे आमदार राजू पाटील टीका केली आहे.
लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य सरकारकडे कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही, अशी टीका राजू पाटील यांनी ट्विटद्वारे केली. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)
“तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन आणि धोरण दिसत नाही,” असे ट्विट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
या ट्विटसोबत त्यांना मरिन ड्राईव्ह, रस्त्यावरील ट्राफिक आणि अनेक लोकांच्या रांगा लागलेले फोटो ट्विट केले आहेत.
“तुमचा #lockdown_exit_plan काय ?” असा सवाल मा.राजसाहेबांनी राज्य सरकारला विचारला होता. सरकारकडे या प्रश्नाचं तेव्हाही उत्तर नव्हतं आणि आजही नाही. लोकांना सरकारने वाऱ्यावर सोडून दिलं आहे. कसलेच नियोजन व धोरण दिसत नाही.@CMOMaharashtra @OfficeofUT @PawarSpeaks pic.twitter.com/vzBbYrDJFU
— Raju Patil (@rajupatilmanase) June 8, 2020
लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय, राज ठाकरेंचा सवाल
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची राजकीय बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी लॉकडाऊन संपेल, तेव्हा त्याचा एक्झिट प्लॅन काय? असा प्रश्न विचारला होता.
लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत तुम्ही लॉकडाऊन ठेवू शकत नाही. तो आयत्यावेळी सांगून उपयोग नाही, त्याची आधी कल्पना द्यावी. तो कसा काढणार, काय सुरु होईल, काय बंद होईल, ते लोकांना सांगावं. लॉकडाऊन बंद केला, त्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने कोरोना जाणार नाही. लस येईपर्यंत कोरोना जाऊ शकत नाही, असे राज ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. (MNS Raju Patil Comment on Lockdown Exit plan)
संबंधित बातम्या :