Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेशनकार्डचा रंग बघून उपचार देणार का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल

रेशनकार्डाचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा प्रश्नही मनसे आमदार राजू पाटील यांनी विचारला (MNS MLA Raju Patil On free treatment Corona Patient) आहे.

रेशनकार्डचा रंग बघून उपचार देणार का? मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला सवाल
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 4:04 PM

कल्याण : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 30 हजारांच्या पार पोहोचला (MNS MLA Raju Patil On free treatment Corona Patient) आहे. मुंबईसह कल्याण डोंबिवलीही कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांकडून पैसे आकरले जात आहे. त्यावरुन मनसे आमदार राजू पाटील यांनी रुग्णांकडून बिल आकारणीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. रेशनकार्डाचा रंग बघून उपचार दिला जाईल का? असा प्रश्नही मनसे आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे.

“1 मे रोजी राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना 100 टक्के मोफत उपचार देण्यात येतील अशी घोषणा केली होती. मग आता पांढऱ्या रेशनधारकांना बिल का आकारले जात आहे? कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प पडले असताना रेशनकार्डचा रंग बघून उपचार दिला जाईल का?” असा प्रश्न राजू पाटील यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारला आहे.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 459 वर पोहोचला (MNS MLA Raju Patil On free treatment Corona Patient) आहे. आज एका दिवसात 35 कोरोना रुग्ण आढळले आहे. तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 177 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यातील सर्व नागरिकांना मोफत उपचार

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व 100 टक्के जनतेला सरकारी आणि शासनाने निवडलेल्या खासगी रुग्णालयात मोफत आरोग्य उपचार दिले जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे केली होती. राज्यातील सर्व नागरिकांना मोफत उपचार आणि ‘कॅशलेस विमा’ संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले होते.

करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना काही खासगी रुग्णालयांकडून मनमानी पद्धतीने दर आकारणी केली जात आहे. तिला चाप लावण्याच्या हेतूने राज्य शासनाने हा धाडसी निर्णय घेतला होता.

मुंबई, पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जिप्सा (जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन) सोबत विमा करार झाले आहेत, त्यांनी उपचारदरम्यान निश्चित केलेले दर आकारायचे आहेत. रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये दाखल झालेला असला तरी विमा रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची मागणी करता येणार नाही. या योजनेत सहभागी सर्व खासगी रुग्णालयांना निर्णय बंधनकारकर असणार आहे. या विम्याचा फायदा राज्यातील सर्व जनता घेऊ शकणार आहे, असेही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले (MNS MLA Raju Patil On free treatment Corona Patient) होते.

संबंधित बातम्या : 

Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ

मुंबईत ‘कंटेनमेंट झोन’ची पुनर्रचना, ‘सीलबंद इमारत’ नवी वर्गवारी, काय आहेत निकष?

कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक
धीरेंद्र शास्त्री महाराजांनी केलं छत्रपती संभाजीराजेंचं कौतुक.
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना
तिसऱ्या दिवशी माझ्यावर खुनाचा गुन्हा..गोरेंनी सांगितली 'ती' मधील घटना.
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस...
राज्यातील 'या' भागांना हवामान खात्याचा अलर्ट, पुढील 3 दिवस....
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?
धक्कादायक! डीजेच्या आवाजाने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू?.