यंदा इंजिनला डब्बा लागेल, इंजिन सुस्साट सुटेल; मनसे आमदाराचं सूचक विधान
येणाऱ्या सत्तेत आमचा सहभाग असेल आणि 2029 मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आमचा असेल असा आशावाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे आमदाराने सूचक वक्तव्यं केलेलं आहे.
मी शाळा-कॉलेजात असल्यापासून डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी आणि गुढीपाडव्याला येत आलो आहे. येथे येऊन तरुणांशी संवाद साधतो. डोंबिवलीची जी शान आहे ती फडके रोड…या ठिकाणी येऊन आणि आनंद घेत असतो. माझा विरोधकांनाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा काळ त्यांना भरभराटीचे जावो आणि जो सत्तेत येईल त्यांना ,सुसंस्कृतपणे सत्ता आणि राज्य करण्याची सदबुद्धी मिळो असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. सणासुदीत राजकारण आणू नये, प्रत्येकाने हा सण आपल्या पद्धतीने साजरा करावा असेही राजू पाटील यावेळी म्हणाले.
डोंबीवली येथील गणेश मंदिराचा सिद्धिविनायक मंदिरासारखे आहे. मी येथे गणेशाचा आशीवार्द घ्यायला त्याला साकंड घालायला देखील आलो असल्याचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. सर्वांचे आरोग्य व्यवस्थित राहो आणि माझ्या पक्षाला भरभरुन यश मिळो असेही राजू पाटील यांनी यावेळी सांगितले. मनसेला या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे.राज ठाकरे यांनी स्वतः म्हटलंय की आम्ही सत्तेत असणार आहे. येणारा काळ हा माणसासाठी चांगला असणार असणार आहे असा आत्मविश्वासही राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
यंदा इंजिनाला डब्बाही लागेल
यावेळेस 100% इंजिन धावणार आहे. पाच वर्षे एकटं इंजिन धावत होते. यावेळेस त्याला डब्बाही लागलेला असेल, त्यामुळे हे इंजिन सुसाट धावेल असे राजू पाटील यावेळी म्हणाले. सगळीकडे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे राज ठाकरे यांची भूमिका लोकांना पटत आहे. राजकारणाचा चिखल झालेला आहे त्यात सुधार आणि दुरुस्ती करण्यासाठी राजकारणातील शान आणि महाराष्ट्राची संस्कृती परत कशी येईल यासाठी राज ठाकरे यांनी जाहिरात दिली होती ती लोकांना भावली. त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला राजकारणाची पत आणि पोस्त सुधारली पाहिजे असे लोकांचे मत आहे. त्या अनुषंगाने आम्हाला चांगल्या समर्थन मिळत आहे, त्यामुळे आमचे इंजिन सुसाट धावणार असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.