शिवाजी पार्कची रोषणाई जनतेच्या पैशातून का? महिन्याच्या ‘कलेक्शन’मधून करा, मनसेचा टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो संदीप देशपांडे यांनी शेअर केला आहे. (Sandeep Deshpande Facebook Post)

शिवाजी पार्कची रोषणाई जनतेच्या पैशातून का? महिन्याच्या 'कलेक्शन'मधून करा, मनसेचा टोला
उद्धव ठाकरे, संदीप देशपांडे
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 8:41 AM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज पार्कला विद्युत रोषणाई करण्याचे श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळू नये, यासाठी घाट घातला जात आहे. खरोखरच करायचं असेल, तर जनतेच्या पैशातून का? महिन्याला येण्याऱ्या ‘कलेक्शन’मधून करा, असा टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. (MNS Sandeep Deshpande Facebook Post on Shivaji Park Lighting)

संदीप देशपांडे यांचे आरोप काय?

“दरवर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा, म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय मनसेला मिळू नये, म्हणून जनतेच्या पैशातून वर्षभर रोषणाई करण्याचा घाट घातला जात आहे. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होते का? आणि खरोखरच करायचं आहे, तर जनतेच्या पैशातून का ? महिन्याला येण्याऱ्या “collection” मधून करा. असो शुभेच्छा” अशी उपरोधिक फेसबुक पोस्ट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांचे पत्र काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा फोटो संदीप देशपांडे यांनी शेअर केला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज पार्कला अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी तसेच अनेक खेळाडू आणि इतर नागरिक धावण्यासाठी मैदानाच्या भोवतालच्या पाऊलवाटेचा/मार्गिकेचा वापर करत असतात. परंतु सदर ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना असुविधा होते. सदर पाऊलवाटेच्या लगत अतिरिक्त विद्युत दिवे आणि इतर सुशोभिकरण करण्यासाठी माझ्या आमदार निधीतून सव्वा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा” असं पत्र उद्धव ठाकरे यांनी लिहिलं आहे.

दर वर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्क ला स्वखर्चाने विद्युत रोषणाई करत…

Posted by Sandeep Deshpande Adhikrut on Sunday, 21 March 2021

काय आहे कलेक्शन प्रकरण?

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद थेट या पत्रात दिला आहे. तारीख आणि वेळेसहित हा संवाद असल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या :

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

(MNS Sandeep Deshpande Facebook Post on Shivaji Park Lighting)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.