विश्वप्रवक्ते संजय राऊत… नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता देशात नाही , असं आपणच म्हणाला होतात.. मनसे नेत्याचा हल्लाबोल
राज ठाकरे यांचं हेच पाऊल शिवसेनेला ( उद्धव ठाकरे गट) फारसं रुचलेलं नाही कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावरून तिखट प्रतिक्रिया दिली.
मुंबई | 20 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा नुकताच पार पडला. त्यांनी काल भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहांची भेट घेतल्यानंतर मनसेच्या महायुतीतील समावेशाच्या चर्चांनी जोर धरला. मात्र त्यावर राज ठाकरे किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का? बदल्यात मनसेला काय मिळणार ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र मनसे महायुतीसोबत गेल्यास उद्धव ठाकरे गटाला फटका बसू शकतो. राज ठाकरे यांचं हेच पाऊल शिवसेनेला ( उद्धव ठाकरे गट) फारसं रुचलेलं नाही कारण शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावरून तिखट प्रतिक्रिया दिली.
“राज ठाकरे महायुतीमध्ये गेल्याने काही फरक पडत नाही. महाराष्ट्र, मुंबईतील जनता सूज्ञ आहे. महाराष्ट्रावर चाल करुन येणाऱ्या महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या अनेक शाह्यांचा जनतेने समाचार घेतलाय. महाराष्ट्रावर घाव घालणाऱ्या अशा शक्तींना कोणी मदत करत असेल, तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही” असं संजय राऊत म्हणाले होते. त्यांचं हेच विधान आणि एकंदर भूमिका मनसे कार्यकर्त्यांना, नेत्यांना आवडलेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते /सचिव योगेश खैरे यांनी X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया अकाऊंटवरून संजय राऊत यांनाच खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्रातील जनतेला आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आहेत हे ध्यानात असू द्या ! असा इशाराही त्यांनी दिला.
काय म्हटलं ट्विटमध्ये ?
योगेश खैरे यांनी संजय राऊत यांचा विश्वप्रवक्ते असा खोचक उल्लेख करत, त्यांना उद्देशून ट्विट करत त्यांच्या काही विधानांची आठवण करून दिली. तसेच महाराष्ट्रातील जनतेला आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आहेत हे ध्यानात असू द्या ! असा इशारा त्यांनी दिला.
योगेश खैरे यांचं ट्विट जसंच्या तसं, त्यांच्याच शब्दांत..
मा. संजय राऊत विश्वप्रवक्ते
सध्या अचानक आपल्याला जुन्या काही गोष्टी आठवू लागल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेला आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आहेत हे ध्यानात असू द्या ! अनेक गोष्टी आहेत त्यातील काहींची आठवण करून देतो !!
• नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता देशात नाही आणि पुढील 25 वर्षे होऊ शकत नाही असं आपण स्वतः म्हणाला होतात.
• शिवसेना भाजपसोबत युतीत सडली असं 2017 ला आपले पक्षप्रमुख म्हणाले होते…. मग 2019 साली पुन्हा भाजपसोबत युती केली.
• तरीही पुन्हा सडू न देता जनतेने तुम्हाला एकत्र सत्ता दिली तरीही तो जनादेश अव्हेरून विचारधारेच्या विरुद्ध पक्षांसोबत फक्त मुख्यमंत्री पदासाठी युती केली.
• आपले पक्षप्रमुख आणि आपण शिवतीर्थावर ज्यांच्या सोबत बसले होते त्यांच्याबाबत किती टोकाचं आपण बोलला होतात…. आठवतंय का ?
• आपल्या पक्षाच्या मुखपत्रात मराठा मोर्चाचा उल्लेख मुका मोर्चा असा कुणी केला होता ?
• आणि आपली विचारधारा कधी काळी हिंदुत्ववादी होती…. आठवतंय का ?
अशा शब्दांत योगेश खैरे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रति, मा. संजय राऊत विश्वप्रवक्ते
सध्या अचानक आपल्याला जुन्या काही गोष्टी आठवू लागल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेला आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आहेत हे ध्यानात असू द्या ! अनेक गोष्टी आहेत त्यातील काहींची आठवण करून देतो !!
• नरेंद्र मोदींच्या उंचीचा नेता देशात नाही आणि पुढील…
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) March 20, 2024