Jasleen Matharu | जसलीन मथारू-अनुप जलोटा वधू-वर वेशात, सोशल मीडियावरील फोटोंवर चाहत्यांकडून प्रश्नांची सरबत्ती!

या फोटोंमुळे सध्या तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून, तिच्या फोटोंवर प्रश्नार्थक कमेंट्सचा पाऊस पडायला लागला आहे.

Jasleen Matharu | जसलीन मथारू-अनुप जलोटा वधू-वर वेशात, सोशल मीडियावरील फोटोंवर चाहत्यांकडून प्रश्नांची सरबत्ती!
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 11:06 AM

मुंबई :बिग बॉस’ची माजी स्पर्धक जसलीन मथारूने (Jasleen Matharu) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या तिच्या चाहत्यांना धक्का बसला असून, तिच्या फोटोंवर प्रश्नार्थक कमेंट्सचा पाऊस पडायला लागला आहे. जसलीनने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती आणि ज्येष्ठ गायक अनुप जलोटा (Anup Jalota) वधू-वराच्या वेशात दिसत आहेत. कुठलेही कॅप्शन न देता तिने ही फोटो शेअर केले आहेत. (Model Jasleen Matharu shares weeding photographs with anup Jalota)

जसलीनने शेअर केलेल्या फोटोत ती गुलाबी रंगाच्या सलवार कमीजमध्ये दिसत आहे. वधूच्या वेशात असलेल्या जसलीनने (Jasleen matharu) भरजरी दागिने परिधान केले आहेत. यात तिने पंजाबी वधूप्रमाणे हातात चुडादेखील भरला आहे. तर, तिच्या बाजूला नवरदेवाच्या वेशात अनुप जलोटा (Anup Jalota) बसलेले दिसत आहेत. त्यांनी देखील शेरवानी आणि पगडी परिधान केली आहे.

View this post on Instagram

?? @anupjalotaonline

A post shared by Jasleen Matharu ਜਸਲੀਨ ਮਠਾੜੂ (@jasleenmatharu) on

चाहत्यांची प्रश्नांची सरबत्ती!

जसलीनने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडायला लागला आहे. ‘तुम्ही लग्न केले का?’, ‘लग्न कधी झाले?’ अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झाला आहे. तर, काहींनी या फोटोमागचे गुपित देखील उघड केले आहे. जसलीन आणि अनुप जलोटा यांचा आगामी चित्रपट ‘वो मेरी स्टूडेंट है’च्या चित्रीकरणादरम्यानचे हे फोटो आहेत. जसलीन आणि अनुप जलोटा यांच्यात ‘बिग बॉस -12’च्या घरामध्ये रिलेशनशिप असल्याची अफवा पसरली होती. तथापि, नंतर याबद्दल बोलताना, त्यांनी दोघांचे नाते गुरु आणि शिष्याप्रमाणे असल्याचे म्हटले होते. (Model Jasleen Matharu shares weeding photographs with anup Jalota)

डॉक्टरला देट करतेय जसलीन

यावर्षी जुलैमध्ये जसलीनने भोपाळ येथील डॉक्टर अभिजीत गुप्ता यांना डेट करत असल्याची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने अनुपजींमुळेच मला माझा जीवनसाथी भेटल्याचे सांगितले होते. याबद्दल सांगताना जसलीन म्हणाली, ‘अनुपजींनी अभिजीतशी माझी ओळख करुन दिली. अनुपजी आणि अभिजीतचे वडील मित्र आहेत. लॉकडाऊन दरम्यान मी भोपाळमध्ये होते आणि तिथे 15 दिवस राहिल्यानंतर मी परत आले आहे. मी अभिजीत आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटले. भोपाळमध्ये आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला. लॉकडाऊनमुळे आम्ही जास्त फिरू शकलो नाही. परंतु, आमच्याकडे एकमेकांसाठी खूप वेळ होता. ही आमची पहिलीच भेट होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून आम्ही कॉल आणि व्हिडिओ कॉलवर बोलत आहोत.’

(Model Jasleen Matharu shares weeding photographs with anup Jalota)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.