नवी दिल्ली : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 13 विविध देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 14 हजार 800 भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरु केल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने आराखडा तयार केला आहे. 7 ते 13 मे या आठवड्याभराच्या कालावधीत 64 विमानांनी टप्प्याटप्प्यात जवळपास 15 हजार भारतीय मायदेशी परत येतील. (14,800 Indian nationals stranded abroad to return by 64 flights in seven days)
पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवार 7 मे रोजी दहा विमानांच्या उड्डाणांनी 2300 भारतीय परतणार आहेत. दुसर्या दिवशी नऊ देशांतील 2050 भारतीय नागरिक चेन्नई, कोची, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरु आणि दिल्लीला परत जातील. तिसर्या दिवशी 13 देशांतील अंदाजे 2050 भारतीय चेन्नई, कोची, मुंबई, लखनौ आणि दिल्लीला परततील. चौथ्या दिवशी अमेरिका, यूएई आणि लंडनहून 1850 भारतीयांना परत आणण्याची योजना आहे.
एअर इंडियाची उड्डाणे होणार
एअर इंडिया आणि त्यांचे सहाय्यक ‘एअर इंडिया एक्सप्रेस’मार्फत ही विशेष उड्डाणे केली जातील. यूएई, यूके, यूएसए, कतार, सौदी अरेबिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स, बांगलादेश, बहारेन, कुवैत आणि ओमान या तेरा देशांमधून भारतीयांना मायदेशी परत आणले जाईल.
7 ते 13 मे दरम्यान भारतातून यूएईसाठी 10, यूएस आणि ब्रिटनसाठी प्रत्येकी सात, सौदी अरेबिया आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच, तर कतारसाठी दोन विमानांचं उड्डाण होईल.
हेही वाचा : स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च काँग्रेस उचलणार, सोनिया गांधींची घोषणा
बांगलादेश आणि मलेशियाला प्रत्येकी सात, तर कुवैत आणि फिलीपिन्सला प्रत्येकी पाच उड्डाणे होतील. या व्यतिरिक्त ओमान आणि बहारेनसाठी प्रत्येकी दोन उड्डाणे होणार आहेत.
64 उड्डाणांपैकी केरळमधून 15, दिल्ली आणि तामिळनाडूहून प्रत्येकी 11, महाराष्ट्र आणि तेलंगणा येथून प्रत्येकी सात, तर उर्वरित उड्डाणे पाच इतर राज्यांमधून होतील. अमेरिकेत मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी आणि पर्यटक अडकले असल्याने येत्या आठवड्यात विमानांची संख्या वाढवली जाऊ शकते.
Central government likely to operate 64 flights from May 7 to 13 to bring home around 14,800 Indian nationals stranded abroad because of coronavirus lockdown: Officials
— Press Trust of India (@PTI_News) May 5, 2020