निकालापूर्वीच पंतप्रधान मोदींना परदेशातून शुभेच्छा सुरु
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सातही टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या आकड्यांनुसार एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशातून शुभेच्छा येण्यासही सुरुवात झाली आहे. पहिल्या शुभेच्छा शेजारील देश मालदीवमधून आल्या आहेत. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. रविवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सातही टप्प्यातील मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले. या आकड्यांनुसार एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परदेशातून शुभेच्छा येण्यासही सुरुवात झाली आहे. पहिल्या शुभेच्छा शेजारील देश मालदीवमधून आल्या आहेत. मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांना मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
रविवारी आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळताना दिसतंय. यानंतर नशीद यांचंही ट्वीट आलं. “निवडणूक संपताच नरेंद्र मोदी आणि भाजपला शुभेच्छा देतो. पंतप्रधान आणि एनडीए सरकारसोबत मजबूत संबंध ठेवण्यासाठी मालदीवची जनता आणि मालदीव सरकारला आनंद होईल याची मला खात्री आहे,” असं ट्वीट नशीद यांनी केलं.
As Indian polls close, congratulations are in order for @narendramodi and the BJP. I am sure the Maldives people and Govt will be delighted to continue their close cooperation with the PM and the BJP-led Govt.
— Mohamed Nasheed (@MohamedNasheed) May 19, 2019
मालदीवमधील राजकीय अस्थिरतेनंतर पुन्हा एकदा भारत आणि मालदीवचे संबंध सुधारले आहेत. नोव्हेंबर 2018 मध्ये मालदीवचे नवे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा शपथविधी झाला होता. यासाठी पंतप्रधान मोदींचीही उपस्थिती होती. सोलिह यांनी अब्दुल यामिन यांचा पराभव करत विजय मिळवला होता. डिसेंबर 2019 मध्ये सोलिह भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी भारताने आर्थिक अडचणीत असलेल्या मालदीवला 97.43 अब्ज रुपयांचं कर्जही दिलं होतं.
टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटरचा एक्झिट पोल
‘टीव्ही 9 मराठी आणि सी-व्होटर’ यांनी मिळून देशभरातील 542 लोकसभा मतदारसंघातील 4 हजारांपेक्षा जास्त विधानसभा क्षेत्रांमध्ये पाच लाखांहून अधिक मतदारांचा सर्व्हे केला आहे. देशात पुन्हा मोदी सरकार येण्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहे. भाजपप्रणित एनडीएला देशात 287 जागा, तर काँग्रेसप्रणित यूपीएला केवळ 128 जागा मिळतील, असा अंदाज Tv9-C Voter च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, एनडीए आणि यूपीए वगळता इतर पक्षांना 127 जागा मिळतील, असेही या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.
व्हिडीओ :