राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आपलेपणाचे अमृत: मोहन भागवत

संघ म्हणजे संकल्पनेच्या पातळीवर संपूर्ण हिंदू समाज. स्वयंसेवक या समाजासाठी आपलेपणातून जे जे कार्य शक्य होईल ते करतो. | Mohan Bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आपलेपणाचे अमृत: मोहन भागवत
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 2:29 PM

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आपलेपणाचे अमृत असल्याची भावना सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी व्यक्त केली. डॉ. हेडगेवारांनी आपल्या देशाला आपलेपणाचे अमृत द्यायचं काम केलं आणि त्याचं नाव संघ. संघ हा प्रत्येक स्वयंसेवकांचा प्राण आहे, त्याचा आत्मा आहे. स्वयंसेवक संघाचे हातपाय म्हणून काम करतात. संघ म्हणजे संकल्पनेच्या पातळीवर संपूर्ण हिंदू समाज. स्वयंसेवक या समाजासाठी आपलेपणातून जे जे कार्य शक्य होईल ते करतो. रमेश पतंगे यांच्या विविधांगी कार्यातही याच आपलेपणाचे प्रकटीकरण झालेले दिसते, असे मोहन भागवत यांनी सांगितले. (Mohan Bhagwat in RSS ceremony in Mumbai)

सा. विवेकचे माजी संपादक व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विवेक समूहातर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी म्हटले की, रमेश पतंगे संविधानासारख्या विषयाची अतिशय साध्या, सोप्या भाषेत मांडणी करतात ते या आपलेपणामुळेच. आपल्या लोकांसाठी लिहायचे , त्यांना समजेल असे लिहायचे या आपलेपणाच्या भावनेमुळे. त्या आपलेपणाचे हे अमृत आहे. त्यामुळे आजचा अमृत महोत्सव सोहळा विशेष असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले.

देशात अस्थितरता निर्माण करण्याचे प्रयत्न: फडणवीस

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की संविधानातील तत्त्वे सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य रमेश पतंगे यांनी केले. सध्या लोकशाहीला कमजोर करण्याचे, देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांचा जागर करणाऱ्यांमध्ये रमेश पतंगे एक आहेत, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की संविधानात समता आहे समरसतेचा उल्लेख त्यात नाही असे विचारणारे असतात. परंतु समरसता हा समतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. हिंदुत्व व समरसता अद्वैत आहे हा विचार रमेशजींनी मांडल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी प्रख्यात अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची भेट घेतली. दीड तासापेक्षा जास्त काळ दोघांमध्ये चर्चा रंगली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला राजकीय महत्त्व आहे. सरसंघचालक मोहन भागवत आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते.

संबंधित बातम्या :

मिथुन चक्रवर्तीला त्यांची मुलं ‘पप्पा’ म्हणत नाहीत, कारण…

मोहन भागवतांचं वक्तव्य मूर्खपणाचं, सोनम कपूरची आगपाखड

(Mohan Bhagwat in RSS ceremony in Mumbai)

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....