PUNE LOKSABHA 2024 | भाजपचे मोहोळ, कॉंग्रेसचे जोशी, धंगेकर की मनसेचे मोरे? लोकसभेत पुणेकरांची पहिली पसंती कुणाला?

2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा अद्याप रिक्त आहे. याच जागेवर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मनसेचे वसंत मोरे आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांनी कंबर कसायला सुरवात केली आहे.

PUNE LOKSABHA 2024 | भाजपचे मोहोळ, कॉंग्रेसचे जोशी, धंगेकर की मनसेचे मोरे? लोकसभेत पुणेकरांची पहिली पसंती कुणाला?
PUNE LOKSABHA Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 11:58 PM

मुंबई | 9 मार्च 2024 : देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी आणि सर्वात जुने शहर म्हणजे पुणे, महाराष्टाच्या सांस्कृतिक विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योग, शिक्षण, शहरी विकास प्रत्येक बाबतीत पुण्याची गणना देशातील प्रसिद्ध शहरांमध्ये केली जाते. देशातील सर्वात मोठ्या आयटी हब असलेले हे शहर. त्यामुळेच देशाचे लक्ष ज्याप्रमाणे मुंबई वेधून घेत त्याचप्रमाणे पुणेही लोकांना आपल्यकडे आकर्षित करून घेते. ब्राम्हण, मराठे, दलित यांचे संमिश्रण असणारे पुणे. म्हणूनच पुण्यातून उमेदवारी द्यायची झाल्यास त्यासाठी अनेक निकष ठरविले जातात. आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही पुण्याची उमेदवारी मिळावी यासाठी रस्सीखेच सुरु झालीय.

पुणे लोकसभेत कधी कॉंग्रेस तर कधी भाजप असे उमेदवार विजयी होत आले आहेत. 2019 च्या निवडणुकीत निवडून आलेले भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा अद्याप रिक्त आहे. याच जागेवर 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, मनसेचे वसंत मोरे आणि कॉंग्रेसचे मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांनी कंबर कसायला सुरवात केली आहे.

2004 आणि 2009 मध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश कलमाडी विजयी झाले होते. 2014 मध्ये भाजपचे अनिल शिरोळे तर 2019 मध्ये भाजपचेच गिरीश बापट विजयी झाले. काँग्रेसचे मोहन जोशी यांचा बापट यांनी दुप्पट मतांनी पराभव केला होता. परंतु, 29 मार्च 2023 रोजी गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त जागेवर यावेळी कोणता पक्षाने कुणाला उमेदवारी देणार हे पाहणे मनोरंजक असेल.

भाजपच्या बाजूने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे नाव चर्चेत आहे. हा तरुण मराठा चेहरा आहे. लोकांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे. तर, जगदीश मुळीक यांचेही नाव चर्चेत आहे. पुण्यातील पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून ते परिचित आहेत. आक्रमक वृत्तीसाठीही ते ओळखले जाते. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे ही तांच्या जमेची बाजू आहे. या दोन व्यक्तींशिवाय भाजपचे आणखी एक मोठे नाव चर्चेत आहे ते म्हणजे सुनील देवधर. आंध्र प्रदेशचे सहप्रभारी, पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचे 2014 मध्ये ते प्रचार व्यवस्थापक होते. हा पक्षाचा ब्राह्मण चेहरा आहे.

भाजपचे असे तीन चेहरे चर्चेत असले तरी कॉंग्रेसही त्यात मागे नाही. गेल्यावेळी लोकसभा निवडणूक लढविणारे कॉंग्रेसचे मोहन जोशी यावेळीही पुन्हा रेसमध्ये उतरले आहेत. पुण्यातील काँग्रेसचा हा जुना चेहरा आहे. त्याचसोबत कसबा येथील पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाले आमदार रवींद्र धंगेकर ही नावदेखील रेसमध्ये आहेत. कॉंग्रेसचा आक्रमक नेता म्हणून त्यांची ओळख आहे. पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय ऐतिहासिक ठरला. कारण, ही जागा 1995 पासून भाजपच्या ताब्यात होती.

भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात पुणे लोकसभेसाठी चुरस होईल अशी अपेक्षा असतानाच मनसेचे वसंत मोरे यांनीही या रिंगणात उडी घेतलीय. वसंत मोरे यांची मनसेचे फायर ब्रॅंड नेते म्हणून ओळख आहे. मनसेचे माजी नगरसेवक असलेले मोरे यांनी प्रभागात अनेक चांगली कामे केली. मनसेचे पुणे शहराचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे पुणेकरांचं लक्ष लागून राहिलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.