कुत्र्याच्या भीतीने पिल्लासह माकड दोन दिवस मोबाईल टॉवरवर अडकून

कुत्र्याच्या भीतीने वर्ध्यात एक माकडीण थेट मोबाईल टॉवरवर जाऊन (Monkey on mobile tower Wardha) बसली.

कुत्र्याच्या भीतीने पिल्लासह माकड दोन दिवस मोबाईल टॉवरवर अडकून
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 2:04 PM

वर्धा : कुत्र्याच्या भीतीने वर्ध्यात एक माकडीण थेट मोबाईल टॉवरवर जाऊन (Monkey on mobile tower Wardha) बसली. या माकडीणीसोबत तिचे पिल्लू असल्यामुळे तिने स्वत:चा आणि पिल्लाचा बचाव करत थेट मोबाईल टॉवर गाठले. कुत्र्याच्या भीतीने माकडीणीला दोन दिवस मोबाईस टॉवरवर काढावे (Monkey on mobile tower Wardha) लागले.

मोबाईल टॉवर खाली कुत्रे आणि माणसांना पाहून माकडीण खाली येत नव्हती. टॉवर वरती तहान आणि भूक अशा परिस्थिती असणाऱ्या माकडीणीला पीपल फॉर अॅनिमलच्या मदतीने रेस्क्यू करण्यात आले आहे. माकडीणीला पिल्लासह सुखरूप खाली उतरवून तिच्यावर उपचार करुन तिला सोडण्यात आले.

वर्ध्याच्या बोरखेडी या गावात शेतात सध्या पेरणीचे दिवस सुरु आहेत. या दरम्यान शेतात उतरलेल्या माकडांच्या कळपाला हाकलून लावण्यासाठी कुत्र्यांनी सपाटा लावला. त्यामुळे माकडं सैरावैरा पळाली. पण कळपातील एका माकडीणीचे कुत्र्याने लचके तोडले.

पिल्लूजवळ असणाऱ्या मकडीनने जीव वाचवत शेतातीलच मोबाईल टॉवरचा उंच भाग गाठला. संपूर्ण एक दिवस माकड जागचे हलले नाही. अखेर शेतकऱ्यांनी माकडाला खाली उतरविण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न अपयशी ठरला. पिल्लाची काळजी असल्यामुळे माकड टॉवरवरुन खाली उतरले नाही. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी शेतात येऊन पाहिले तर माकड जैसे थे.

त्यानंतर आता कारावे काय या प्रश्नाने शेतकऱ्यांना सतावले. अखेर पीपल फॉर अॅनिमलच्या पथकाला बोलावण्यात आले. या पथकाने अत्यंत शिताफीने टॉवरवर चढून माकडीणीला आणि तिच्या पिल्लाला सुखरुप खाली उतरवले.

वसंत ऋतूच्या आगमनात आपल्या पिलाला वाचविण्यासाठीची माकडीणीची धडपड पाहणाऱ्या शेतकऱ्यांनीही पिल्लासह माकड खाली उतरल्याने समाधान व्यक्त केले. उपचारासाठी तिला रुग्णालयातही नेण्यात आले.

संबंधित बातम्या :

पुण्यात 30 माकडांवर कोरोना लसची चाचणी होणार : वनमंत्री संजय राठोड

माकडाने कोरोना रुग्णाचे नमुने पळवले, तंत्रज्ञावर हल्ला करत उच्छाद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.