Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षा सहलीची हौस फिटणार नाही, भुशी डॅमसह पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्यात (Monsoon Tourist Places Shut) आली आहे.

वर्षा सहलीची हौस फिटणार नाही, भुशी डॅमसह पुण्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर बंदी
Follow us
| Updated on: Jun 08, 2020 | 11:53 AM

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्यात (Monsoon Tourist Places Shut) आली आहे. दरवर्षी मुंबई, पुण्यासह राज्यभरातून पर्यटक पावसाळ्यात पर्यटनासाठी भुशी डॅम, घाट परिसर, गड- किल्ल्यांवर जातात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्व पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

पावसाळा सुरु झाला की, अनेकजण मित्र मैत्रिणींसह पिकनीकची तयारी करत (Monsoon Tourist Places Shut) असतात. कोणत्या ठिकाणी फिरायला जायचं याचं प्लनिंगही पावसाळ्यापूर्वी झालेले असते. गड-किल्ले, डॅम, घाट परिसर दर पावसाळ्यात वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते.

मात्र यंदा कोरोनामुळे पुणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन असणाऱ्या ठिकाणांना बंदी घालण्यात आली आहे. यात लोणावळ्यातील भुशी धरण, पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण, ताम्हिणी घाट परिसर, खडकवासला धरण, भीमाशंकर, माळशेज घाट, भाटघर धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील गडकिल्ले आणि पानशेत धरण परिसरातही पर्यटनाला बंदी आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी याबाबतचे आदेश दिले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे यंदा कोरोनामुळे मुंबईसह पुणेकरांना पावसाळी पर्यटनाला मुकावे लागणार (Monsoon Tourist Places Shut) आहे.

संबंधित बातम्या : 

निसर्गाचं सौंदर्य, धुक्याची चादर, मुंबई-पुण्याजवळील 10 प्रसिद्ध ठिकाणं

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.