बीडमधील 13000 महिलांनी गर्भपिशवी काढली, समितीचा अहवाल

यावर शस्त्रक्रिया करून त्यावर निदान करण्यापेक्षा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क गर्भ पिशवीच काढून टाकण्याचा गोरखधंदा सुरू केला. तब्बल 13 हजार महिलांचे गर्भाशय (hysterectomies in beed) काढून फेकण्यात आल्याचा एक अहवाल नुकताच प्राप्त झालाय.

बीडमधील 13000 महिलांनी गर्भपिशवी काढली, समितीचा अहवाल
Follow us
| Updated on: Aug 29, 2019 | 7:33 PM

बीड : कुटुंबातील महिलेकडे आणि तिच्या आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही हीनच आहे. आरोग्याची काळजी घेतली नसल्याने बीड जिल्ह्यात हजारो महिलांना गर्भपिशवीच्या (hysterectomies in beed) कर्करोगाचा आजार जडला. यावर शस्त्रक्रिया करून त्यावर निदान करण्यापेक्षा जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी चक्क गर्भ पिशवीच काढून टाकण्याचा गोरखधंदा सुरू केला. तब्बल 13 हजार महिलांचे गर्भाशय (hysterectomies in beed) काढून फेकण्यात आल्याचा एक अहवाल नुकताच प्राप्त झालाय.

बीड जिल्हा आणि ऊस तोडणी हे अनोखं समीकरण आहे. इथल्या हजारो नागरिकांपुढे ऊस तोडीला जाणं हाच एकमेव पर्याय आहे. एका सामाजिक महिला कार्यकर्तीसमोर व्यथा मांडणाऱ्या पीडित महिला, ज्यांना त्यांची गर्भाशय पिशवी काढून फेकावी लागली. या महिलांना पिशवीचा कर्करोग झाला होता. त्यातून प्रचंड त्रास व्हायचा. कर्करोग वाढून जीवाला धोका होईल या भीतीपोटी या महिलेने बीडमधील खासगी रुग्णालय गाठलं आणि गर्भातील पिशवीवर उपचार सुरू केले. मात्र कर्करोगाचा प्रभाव जास्त झाल्याने डॉक्टरने या महिलेला गर्भपिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला. जीव वाचेल यासाठी या महिलेने गर्भपिशवी काढून टाकण्यासाठी होकार दिला.

ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. तज्ञांच्या मते, शरीराची योग्य काळजी न घेतल्याने अनेक महिलांना गर्भाशयाचा आजार जडलाय. मासिक पाळी वेळेवर न होणे, पांढरा पदर जाणे, मासिक पाळी दरम्यान कपडा वापरणे, शिवाय उघड्यावर शौचास बसल्यानंतर उठबस करणे यामुळे पिशवीचे कर्करोगाचे आजार जडतात. यातच या अनेक महिला मजूर असल्याने कामाच्या ताणातून असे आजार होत असल्याचं उघड होत आहे. यावर पूर्णपणे उपचार करता येऊ शकतो. पण जिल्ह्यातील डॉक्टरांनी याचा व्यवसाय सुरू केला. कर्करोगावर निदान न करता डॉक्टर चक्क पिशवीच काढून टाकण्याचा अजब सल्ला देत लाखो रुपयांची कमाई करत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

गर्भातच मुलीची हत्या करणारा जिल्हा म्हणून या बीडची संपूर्ण देशात बदनामी झाली होती. स्त्री भ्रूण हत्तेची राजधानी म्हणून या बीडची ओळख झाली. मात्र कडक कारवाईनंतर ही ओळख पुसद झाली असतानाच आता कर्करोगाच्या नावावरून गर्भ पिशवीच निकामी करण्याचा डॉक्टरांचा धंदा सुरू झालाय. यामुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला देणाऱ्या या मुजोर खाजगी रुग्णालयावर काय कारवाई होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.