अभिनेत्री स्पृहा जोशी सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सध्या ती नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तिनं 'Happy Sunday, start the day right with a smile ??'असं कॅप्शन देत साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मराठमोळी स्पृहा जोशी उत्तम अभिनेत्री आणि सुत्रसंचालक तर आहेच मात्र सोबतच ती उत्तम कवयित्रीसुद्धा आहे.
तिच्या कवितांनी ती सगळ्यांना भूरळ पाडत असते. तिने सादर केलेल्या कवितांचे अनेक चाहते आहेत.
तिचं एक स्वत:चं युट्यूब चॅनल ही आहे ती या चॅनलच्या माध्यमातून चाहत्यांसाठी स्वत:च्या आणि नामवंत कविंच्या कविता सादर करत असते. सोबतच ती या चॅनलवरुन चाहत्यांशी संवादही साधत असते.