होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे (Dawood Ibrahim is in Karachi say UNSC report).

होय, दाऊद इब्राहिम कराचीतच, पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली
Follow us
| Updated on: Aug 22, 2020 | 9:42 PM

इस्लामाबाद : कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे (Dawood Ibrahim is in Karachi say UNSC report). पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील याला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनीच यावर प्रकाश टाकला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्यावतीने (UNSC) जगभरातील 88 दहशतवादी नेत्यांची एक यादी तयार करण्यात आली आहे. यात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचीही नावं आहेत.

पाकिस्तान सरकारने दाऊद इब्राहिमची स्थीर आणि जंगम अशी सर्व मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अहवालात देण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमवर मुंबईमध्ये 1993 मध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बहल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. यामागे तोच मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे.

मुंबईतील या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 350 लोकांना आपला प्राण गमवावा लागला होता. तसेच 1200 हून अधिक लोक जखमी झाले होते. भारत सरकारने 2003 मध्ये अमेरिकेसोबत मिळून दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत टाकले होते.

इब्राहिम दाऊद आशिया खंडातील सर्वात मोठा ड्रग तस्कर

संयुक्त राष्ट्र आणि इंटरपोलने दाऊद इब्राहिमला आशिया खंडातील सर्वात मोठा अमली पदार्थ तस्कर म्हणून घोषित केलं आहे. त्याचे दहशतवादी संघटनांशी देखील संबंध असल्याचं म्हटलं आहे. भारताची गुप्तचर संस्था इंटेलिजन्स ब्यूरोच्या (आयबी) माहितीनुसार दाऊद इब्राहिम आणि त्याचा छोटा भाऊ शेख अनीस इब्राहिम सिंथेटिक ड्रग्ससोबतच हेरोईन आणि अफीमचाही व्यवसाय करतो.

दाऊदची कुख्यात डी-कंपनी इंटरनॅशनल सिंडिकेट क्राईम आणि हवाला ऑपरेशन करण्यावर भर देत असल्याचंही समोर आलं आहे. आतापर्यंत डी कंपनीचा ल्यारी गँगसोबत कोणताही वाद समोर आलेला नाही. ल्यारी कराचीमधील दाट वस्ती असलेला परिसर आहे. ल्यारी गुन्हेगारी टोळ्या, ड्रग आणि बंदूक यांच्या व्यवसायासाठी कुख्यात आहे.

संबंधित बातम्या :

योगायोग बघा, 2014 पासून दाऊद सहा वेळा मरुन जिवंत झाला : सचिन सावंत

विकास दुबे ‘नेपाळमधील दाऊद’ ठरु नये, यूपीतील गुंडशाहीवरुन ‘सामना’चा योगी सरकारवर हल्लाबोल

खरंच दाऊदचा कोरोनाने मृत्यू झालाय का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात….

संबंधित व्हिडीओ :

Dawood Ibrahim is in Karachi say UNSC report

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.