अनैतिक संबंधात अडथळा, आईकडून मुलाची हत्या

सातारा : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यात घडली आहे. याबाबत सातारा पोलिसांनी आई अश्विनी प्रकाश चव्हाण आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 28 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वाईतील गंगापूर येथे आर्यन (नाव बदलेले) मनोरंजनाचा कार्यक्रम […]

अनैतिक संबंधात अडथळा, आईकडून मुलाची हत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM

सातारा : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील वाई तालुक्यात घडली आहे. याबाबत सातारा पोलिसांनी आई अश्विनी प्रकाश चव्हाण आणि तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 28 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वाईतील गंगापूर येथे आर्यन (नाव बदलेले) मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो घरी परत न आल्यानं त्याची आई अश्विनीने पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्यनचा मृतदेह धोम धरणाच्या कालव्यात आढळून आला.

यानंतर तपासाला सुरुवात केल्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहायला गेलेला आर्यन कालव्याजवळ कसा पोहोचला? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. त्यावेळी पोलिसांना त्याची आई अश्विनीवर संशय निर्माण झाला. त्यानंतर अश्विनीची कसून चौकशी केली असता, तिने प्रियकर सचिन कुंभार याच्यासोबत मिळून मुलाचा खून केल्याचे सांगितले.

अश्विनीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वाई येथील औद्योगिक वसाहतीत अश्विनी आणि सचिन एकाच कंपनीत कामाला होते. त्याचवेळी त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र या दोघांच्या प्रेमसंबंधात अश्विनीचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे अश्विनीने सचिनच्या मदतीने मुलाचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार 28 एप्रिलला कार्यक्रम संपल्यानंतर आई व प्रियकराने गौरवला रात्री साडेदहाच्या सुमारास धोम धरणाच्या कालव्याजवळ नेले. त्याच्या आईने त्याला थंड सरबतात गुंगीचे औषध दिले आणि सचिनने आर्यनला पाण्यात ढकलले. यानंतर दोघेही घरी गेले. दरम्यान आईच्या अनैतिक प्रेमसंबंधातून आर्यनचा हकनाक बळी गेल्यानं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.