आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसी, तरीही मोदी-शाहांचा पाठिंबा, कंगनाच्या आईकडून केंद्राचे आभार

कंगनाला सुरक्षा दिल्याबद्दल अमित शाहजींचे आभार, तिला संरक्षण दिले नसते तर न जाणो तिचे काय झाले असते, अशा भावना आशा रनौत यांनी व्यक्त केल्या.

आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसी, तरीही मोदी-शाहांचा पाठिंबा, कंगनाच्या आईकडून केंद्राचे आभार
Follow us
| Updated on: Sep 11, 2020 | 9:39 AM

शिमला : “आम्ही सुरुवातीपासून काँग्रेसच्या बाजूने होतो, आमचे आजोबा पण काँग्रेसी होते, पण आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांचा पाठिंबा मिळाला” याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतची आई आशा रनौत यांनी मोदी सरकारचे आभार मानले. (Mother of Kangana Ranaut Asha Ranaut thanks HM Amit Shah)

‘संपूर्ण भारतातील जनतेच्या सदिच्छा कंगनासोबत आहेत. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे, ती नेहमीच सत्याच्या पाठीशी उभी असते. आम्ही केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो, त्यांनी माझ्या मुलीचे रक्षण केले. कंगनाला सुरक्षा दिल्याबद्दल अमित शाहजींचे आभार, तिला संरक्षण दिले नसते तर न जाणो तिचे काय झाले असते’ अशा भावना आशा रनौत यांनी व्यक्त केल्या.

कंगनाची आई म्हणाली, ‘आम्ही सुरुवातीपासूनच काँग्रेससोबत होतो. आमचे आजोबासुद्धा सुरुवातीपासूनच काँग्रेस समर्थक होते. पण आम्हाला अमित शाहांचा पाठिंबा मिळाला. मी माझ्या मुलीसाठी प्रार्थना करते” असे म्हणत कंगनाच्या आई आशा रनौत यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचेही आभार मानले.

(Mother of Kangana Ranaut Asha Ranaut thanks HM Amit Shah)

मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह आणि मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर कंगना आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याचा इशारा दिला, असा दावा कंगनाने केला. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा हक्क नसल्याचं म्हटलं. यानंतर शिवसेना नेत्यांनीही कंगनाला मुंबईत न येण्यास बजावलं होतं.

कंगनाकडून ऑफिसच्या तोडकामाची पाहणी 

कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयावर महापालिकेचा हातोडा पडला. कंगनाच्या याचिकेनंतर हायकोर्टाने पाडकामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. तसेच पालिकेला आपले म्हणणे मांडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कंगनाने पालिकेने कारवाई केलेल्या ऑफिसच्या तोडकामाची पाहणी केली.

संबंधित बातम्या :

 मुंबई कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही : रामदास आठवले

बीएमसीची ऑफिसवर कारवाई, कंगनाकडून बाबर आणि पाकिस्तानशी तुलना

(Mother of Kangana Ranaut Asha Ranaut thanks HM Amit Shah)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.