न थांबता, न थकता, न झोपता सलग तीन दिवस धावला, भारताच्या ब्रिज शर्माचा नवा विक्रम

सलग तीन दिवस न थांबता, न थकता, न झोपता जर कुणी धावत असेल तर हे एकून तुम्ही थक्क (Burj Sharma racing record) व्हाल. पण नौदलमधील इंजीनिअर ब्रिज शर्मा यांनी सलग तीन दिवस धावत एक नवा विक्रम आपल्या नावे नोंद केला आहे.

न थांबता, न थकता, न झोपता सलग तीन दिवस धावला, भारताच्या ब्रिज शर्माचा नवा विक्रम
Follow us
| Updated on: Mar 13, 2020 | 8:27 PM

मुंबई : सलग तीन दिवस न थांबता, न थकता, न झोपता जर कुणी धावत असेल तर हे एकून तुम्ही थक्क (Burj Sharma racing record) व्हाल. पण नौदलमधील इंजीनिअर ब्रिज शर्मा यांनी सलग तीन दिवस धावत एक नवा विक्रम आपल्या नावे नोंद केला आहे. हा विक्रम ब्रिज यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 350.7 किलोमीटरच्या डिलिरिअस  रेसमध्ये केला. ही रेस ब्रिज यांनी 86.35 तासात पूर्ण करत एक इतिहास रचला. यापूर्वीही शर्मा यांनी या रेसमध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांनी 95.39 तासात ही रेस पूर्ण केली (Bruj Sharma racing record) होती. या रेसच्या वेळेची मर्यादा एकूण 104 तास असते.

ब्रिज शर्मा यांचे वय 46 आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या रेसमध्ये इतिहास रचत 135 कोटी भारतीयांची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. 1974 मध्ये राजस्थानच्या जयपूरमध्ये ब्रिज यांचा जन्म झाला. 15 वर्षाचे असताना मुंबईत आल्यावर त्यांना नौदलात नोकरी मिळाली. ब्रिज यांना पहिल्यापासून धावण्याचा छंद होता. त्यांनी 2015 मध्ये माऊंट एव्हरेस्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. पण भूकंप झल्याने ते बर्फाखाली दबले गेले. पण त्यातून ते वाचले. पण यानंतर त्यांनी थेट 2017 मध्ये माऊंट एव्हरेस्ट सर केला.

ब्रिज यांनी 2016 रोजी अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये शानदार वापसी करत अमेरिकेतील बॅडवॉटर 135 अल्ट्रा मॅरेथॉन 40.47 तासात पूर्ण केली. ही मॅरेथॉन एकूण 217 किलोमीटरची होती. ही रेस पूर्ण करणारे ब्रिज भारतातले दुसरे व्यक्ती आहेत.

“जोपर्यंत माझे शरीर मला साथ देणार तोपर्यंत मी सर्वाधिक किलोमीटर पार करणार. असे माझे लक्ष्य आहे”, असं ब्रिज यांनी सांगितले.

ब्रिज हे पहिले भारतीय आहेत ज्यांनी माऊट एव्हरेस्ट (8848) सर केला आहे. त्यासोबत माऊंट ल्होत्से (8516), माऊंट मनास्लू (8163) सर केले आहेत. तसेच जगातील सर्वात कठीण अल्ट्रा मॅरेथॉन बडवॉटर त्यांनी पूर्ण केली आहे. 2217 मध्ये ट्रेडमिलवर 24 तास धाऊन एशियन रेकॉर्डही आपल्या नावे नोंद केला आहे. विशेष म्हणजे गेल्या 6 वर्षात 100 पेक्षा अधिक किलोमीटरपेक्षा 26 रेसमध्ये सहभाग घेतला.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.