मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली (Amol kolhe SUMAN M Idea) आहे. पुण्यात सर्वाधिक 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे. खासदार अमोल कोल्हे ‘कोरोना’पासून बचावासाठी एक भन्नाट आयडिया सुचवली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केला आहे.
“हात धुवा, हात धुवा, हात धुवा, असे धुवा, तसे धुवा, ऐकून ऐकून कंटाळा आला असेल ना? ऐकण्याचा कंटाळा (Amol kolhe SUMAN M Idea) येऊ द्या, हात धुण्याचा मात्र कंटाळा करु नका, असे अमोल कोल्हेंनी या व्हिडीओत म्हटलं आहे.
अमोल कोल्हेंनी यात एक भन्नाट आयडियाही सुचवली आहे. “अत्यंत सोपी आणि साधी हात धुण्याची पद्धत आहे. त्यासाठी SUMAN M’ हे नाव लक्षात ठेवा. साबण लावून कमीत कमी 20 सेकंद हे चाललं पाहिजे. S – सरळ, U- उलट, M – मूठ, A- अंगठा, N – नखं आणि M म्हणजे मनगट,” असे अमोल कोल्हे म्हणाले.
घाबरू नका.. पण जागरूक रहा..
कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगा..#CoronaVirus #LetsFightCorona pic.twitter.com/5WZhttdTn0— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
“कोरोनापासून वाचण्याचा हा सर्वात साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे. कोरोना घाबरु नका पण जागरुक राहा,” असे आवाहनही अमोल कोल्हेंनी केलं आहे.
घाबरू नका.. पण जागरूक रहा..
कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगा..#CoronaVirus #LetsFightCorona pic.twitter.com/U7HiJilelP— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
इतकंच नव्हे तर कोरोनापासून सावधानतेचे अनेक व्हिडीओही राजेश टोपे यांनी ट्विट केले आहे. यात एका व्हिडीओमध्ये अमोल कोल्हेंनी जनतेला गर्दीची ठिकाणं टाळण्याचे आवाहन केलं आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत मास्कबाबत काही सूचना केल्या आहेत.
घाबरू नका.. पण जागरूक रहा..
कोरोना विषाणूपासून सावधानता बाळगा..#CoronaVirus #LetsFightCorona pic.twitter.com/aSIktXEXQn— Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020
कोरोनाचे कुठे किती रुग्ण?
महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?
कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?
(Amol kolhe SUMAN M Idea)