आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप

आदिवासी विकास विभाग आणि मंत्री के.सी. पाडवी आपली जबाबदारी झटकत असल्याची टिका हिना गावित यांनी केली आहे. | Heena Gavit K C Padavi

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा सुरु करण्याचा निर्णय घाईगर्दीत, खासदार हिना गावित यांचा आरोप
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 2:20 PM

नंदुरबार: राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोना विषयक खबरदारीच्या उपाययोजना केल्याशिवाय सरकार आणि आदिवासी विकास विभाग घाईगर्दीत निर्णय घेत आदिवासी आश्रमशाळा सुरू करत असल्याचा आरोप भाजप खासदार डॉ.हिना गावीत यांनी केला आहे. ( MP Heena Gavit criticize state govt and Tribal Development Minister K. C. Padavi)

आश्रमशाळा सुरू करण्याची काही करू नये. आदिवासी विकास विभागाच्या शाळा निवासी स्वरूपाचे असल्याने या ठिकाणी शाळा सुरू केल्यावर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंदर्भात काय काळजी घेतली जाणार आहे. हे अजूनही गुलदस्त्यात असल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावित यांनी केला आहे.

राज्यभरातील बऱ्याच आदिवासी जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेचे वस्तीगृह आणि शाळा विलीनीकरण कक्ष म्हणून वापरण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाकडून विद्यार्थ्यांची सर्वस्वी जबाबदारी पालकांची राहील, असं प्रतिज्ञापत्र शाळा सुरू करण्यापूर्वी भरून घेतले जात आहे. आदिवासी विकास विभाग आणि मंत्री के.सी. पाडवी आपली जबाबदारी झटकत असल्याची टिका हिना गावित ( Heena Gavit) यांनी केली आहे.

विविध ठिकाणी आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या त्यामध्ये 30 शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. आश्रमशाळांचे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांची टेस्ट करावी, अशी मागणी हिना गावित यांनी केली आहे. शिक्षक रोज येजा करत असल्याने कोरोना वाढण्याची भीती आहे. नंदुरबारमध्ये कोरोनाची स्थिती चांगली पण आश्रमशाळा सुरु केल्यास गाव खेड्यापर्यंत कोरोना संसर्ग वाढेल, अशी भीती गावित यांनी व्यक्त केली. शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना आश्रमशाळेवर राहणं बंधनकारक करावे, ही मागणी देखील त्यांनी केली आहे. ( MP Heena Gavit criticize state govt and Tribal Development Minister K C Padavi)

1 डिसेंबरपासून आश्रमशाळा सुरु: आदिवासी विकासमंत्री 

आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा 1 डिसेंबरनंतर सुरू होतील. हा निर्णय घेण्यात आला असला तरी शासकीय आश्रम शाळा सुरू करताना कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी ( K.C.Padavi) यांनी सांगितले.

शाळा सुरु करताना कोरोनासंदर्भात कोणत्या उपायोजना करण्यात आल्या आहेत याचाही आढावा घेतला जाईल. त्यानंतर शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात येतील,” असे पाडवी म्हणाले. तसेच, यावेळी शाळा सुरु करण्यासाठी कुठल्याही प्रकारची घाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

यवतमाळमध्ये कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरु; विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्रक बंधनकारक

कोरोना परिस्थिती लक्षात घेऊनच आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळा सुरु होणार; के.सी. पाडवींची माहिती

( MP Heena Gavit criticize state govt and Tribal Development Minister K C Padavi)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.