जिम सुरु करा, राज ठाकरे-फडणवीसांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांची मागणी

| Updated on: Aug 19, 2020 | 8:55 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे (MP Supriya Sule demand to reopen gyms).

जिम सुरु करा, राज ठाकरे-फडणवीसांपाठोपाठ सुप्रिया सुळे यांची मागणी
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे (MP Supriya Sule demand to reopen gyms). सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. तेच पत्र ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी जिम उघडण्याची मागणी केली आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिम बंद करण्यात आल्या आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे”, असं सुप्रिया सुळे ट्विटरवर म्हणाल्या आहेत (MP Supriya Sule demand to reopen gyms).

याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी “जिम ओपन करा, बघू काय होतं” असा सल्ला दिला होता.

“विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की जिम सुरु झालं पाहिजे. आता मी सांगतोय, ओपन करा, जिम सुरु करा, ज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतंय” असं राज ठाकरे जिम चालक-मालक यांच्या भेटीनंतर म्हणाले होते.

राज ठाकरे यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून राज्यातील जिम सुरु करण्याची मागणी केली होती. “आज राज्यातील दारु दुकानं उघडली जात असताना जिम मात्र बंद ठेवली जातात. हे अतिशय दुर्दैवी आहे”, असं देवेंद्र फडणवीस पत्रात म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

फडणवीसांशीही बोललो, मी सांगतो, जिम ओपन करा, राज ठाकरेंनी दंड थोपटले

Gym Guidelines | येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग, एसीचे तापमानही निश्चित, जिम-योगा सेंटरसाठी केंद्राची नियमावली