खासदार उदयनराजे भोसले योगी आदित्यनाथांच्या भेटीला, शिवरायांची ‘राजमुद्रा’ भेट
उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा भेट स्वरुपात दिली.
लखनऊ : आग्रा इथल्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली आहे. त्यांच्या या निर्णयाबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आणि योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. यावेळी उदयनराजे भोसले यांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा भेट स्वरुपात दिली.(Udayan Raje Bhosale meet on Uttar Pradesh CM Yogi Adityanath)
आग्रा येथे मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच केली. त्यांच्या या निर्णयाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या नात्याने राजमुद्रा भेट देवून योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले.@myogiadityanath pic.twitter.com/mco2Neqknl
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 6, 2021
सप्टेंबर 2020 मध्ये योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला होता. त्यावेळी आग्रा इथल्या निर्माणाधीन मुघल संग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे तयार होईल, अशी घोषणा केली होती. “नव्या उत्तर प्रदेशात गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीकांना कोणतेही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जय हिंद जय भारत” असे ट्वीट त्यांनी केलं होतं.
आगरा में निर्माणाधीन म्यूजियम को छत्रपति शिवाजी महाराज के नाम से जाना जाएगा।
आपके नए उत्तर प्रदेश में गुलामी की मानसिकता के प्रतीक चिन्हों का कोई स्थान नहीं।
हम सबके नायक शिवाजी महाराज हैं।
जय हिन्द, जय भारत।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) September 14, 2020
महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी योगी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. “।। जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय !” अशी घोषणा फडणवीसांनी ट्विटरवरुन दिली.
।। जय जिजाऊ, जय शिवराय ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ! Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai ! ?? https://t.co/Ro8sA00eOa
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 14, 2020
खासदार उदयनराजे आणि खासदार श्रीनिवास पाटील भेट
खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचीही भेट घेतली होती. या भेटीत साता जिल्ह्याचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत चर्चा झाल्याचं उदयनराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं. श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांचा पराभव केला होता. पण शुक्रवारी उदयनराजे यांनी पाटील यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रश्नांबाबत चर्चा केली.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे खासदार श्रीनिवास पाटील यांची भेट झाली. या भेटीत सातारा जिल्ह्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सामूहिकरित्या संसदेत मांडण्याबाबत चर्चा झाली. pic.twitter.com/8Sl0vZPK6i
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 5, 2021
संबंधित बातम्या :
रस्ता कधी सुरु होणार, राजेंनी हिंदी डायलॉग फेकला, म्हणाले ‘अभी के अभी’
कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे भोसले
Udayan Raje Bhosale meet on Uttar Pradesh CM Yogi Adityanath