शिवनेरीतून कैद्यांना नेण्याची परवानगी द्या !
मुंबई : एसटीची मुंबई ते पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठीत शिवनेरी या वातानुकूलित आरामदायी गाड्यांमधून आता चक्क कैद्यांनी प्रवास करण्याची मागणी केली आहे. वाचून थोडे अचंबित झालात ना…मग नक्की वाचा नेमकी काय भानगड आहे ते… एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून समाजातील 26 घटकांना सवलतीचा प्रवास घडवत असते. त्याची प्रतिपूर्ती राज्य सरकार महामंडळाला करीत असते. त्यात विविध प्रकारच्या […]
मुंबई : एसटीची मुंबई ते पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठीत शिवनेरी या वातानुकूलित आरामदायी गाड्यांमधून आता चक्क कैद्यांनी प्रवास करण्याची मागणी केली आहे. वाचून थोडे अचंबित झालात ना…मग नक्की वाचा नेमकी काय भानगड आहे ते…
एसटी महामंडळ आपल्या बसेसमधून समाजातील 26 घटकांना सवलतीचा प्रवास घडवत असते. त्याची प्रतिपूर्ती राज्य सरकार महामंडळाला करीत असते. त्यात विविध प्रकारच्या दुर्धर आजारापासून ग्रस्त व्यक्तीसह, सामाजिक घटकांना प्रवासात सवलत दिली जात आहे.
एसटी महामंडळ मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी नावाने आलिशान बससेवा चालवित असते. या बसेस ना खूपच मागणी असल्याने त्यांना सतत गर्दी असते. ‘शिवनेरी’च्या बसेस व्होल्वो मल्टी अॅक्सेलच्या असून त्यात जराही धक्के जाणवत नसल्याने आरामदायी सफर घडते. तर काही बसेस हैदराबाद येथील स्कॅनिया कंपनीच्या आहेत. एसटीमध्ये खाजगी आणि स्वमालकीच्या अशा दोन्ही प्रकारच्या शिवनेरी बसेस धावत असतात.
नागपूरच्या शहर पोलीस आयुक्तांनी एसटी महामंडळाना एक पत्र लिहून ‘शिवनेरी’ बसमधून पोलीसांना कैद्यांच्या वाहतूकीची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती.
त्यावर एसटी महामंडळाने शिवशाही बससेवा ही उच्च श्रेणीची वाहतूक सेवा असून या सेवेत केवळ ज्येष्ठ नागरिक सवलत सुविधा शासनाने मंजूर केलेली आहे. या सेवे शिवाय इतर कोणतीही सवलत किंवा सुविधा सरकारने दिलेली नाही. त्यामुळे पोलीस वॉरंट सुविधा मंजूर केलेली नाही.
काही पोलीस कर्मचारी शिवशाही बसेसमधून पोलीस मोटर वॉरंट घेण्याचा आग्रह धरीत एसटी महामंडळाच्या चालक आणि वाहकांशी वाद घालीत असतात. त्यामुळे पोलीसांनी शिवनेरीमधून प्रवास करु नये असे आदेश त्यांना द्यावेत असे एसटी महामंडळाने नागपूर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कळविले आहे.