या गावाने भरले लाडकी बहीण योजनेचे 100 टक्के अर्ज; फक्त एकच आयडिया वापरली अन्…
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा या गावाने आदर्श घ्यावा अशी कामगिरी राज्यातील एका गावाने केली आहे. त्यामुळे 100 टक्के अर्ज भरणारे हे गाव प्रसिद्धीस आले आहे. या गावाने असे काय केले की महिलांनी कौतूक सुरु केले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत महिलांच्या बॅंक खात्यात दर महिन्याला थेट 1500 रुपये जमा होणार असल्याने महिला वर्गाने या योजनेचे जोरदार स्वागत केले आहे. या योजनेसाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने गावा-गावात योजनेची नोंद करण्यासाठी महिलांची अक्षरश:झुंबड उडाली आहे. या योजनेतील बहुतांशी जाचक अटी शिथील झाल्या आहेत. अडीच लाख वार्षिक उत्पन्नाची अट रद्द झाल्याने तसेच रेशनिंग कार्डला आधारभूत मानल्याने या योजनेसाठी मोठी नोंदणी सुरु झाली आहे. या योजनेचे नोंदणी करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर देखील प्रयत्न सुरु असताना एका गावाने तर कमालच करीत गावात 100 टक्के नोंदणी पूर्ण केली आहे. डोमिसाईलची अट देखील
बुलढाणा येथील ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ या योजनेत राज्यातील एका गावाने कमालच केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे 100 टक्के अर्ज भरणारे हे राज्यातील एकमेव गाव ठरले आहे. शेंदला गावातील महिलांनी शंभर टक्के ऑफलाईन अर्ज भरले आहेत. श्री संत गजानन महाराज सेवा समितीचा यासाठी पुढाकार घेतला. आणि गावातच सर्व विभाग एकत्र आणले. त्यामुळे एकाच छताखाली सर्व कामे पटापट उरकण्यात आली.त्यामुळे महिलांना देखील विविध यंत्रणाच्या मागे धावावे लागले नाही. या गावातील महिलांनी श्री संत गजानन महाराज संस्थेचे आभार मानले आहेत.
सर्व कागदपत्रांची दिली मोफत सेवा ..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे शंभर टक्के अर्ज भरणारे शेंदला हे राज्यातील एकमेव गाव ठरले आहे. बुलढाणा येथील मेहकर तालुक्यातील शेंदला हे गाव या योजनेसाठी आदर्श ठरले आहे. गावातील संत श्री गजानन महाराज सेवा समितीने मोठे काम केले आहे. या समितीने गावातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला लागणारे सर्व कागदपत्रांसह झेरॉक्स मशीन सुद्धा एकाच ठिकाणी एकाच छताखाली उपलब्ध करून दिली. तलाटी कार्यालयच गावात आल्याने सर्व विभाग एकाच छताखाली आले. रिणामी अर्ज भरताना रांगा लावण्याचा महिलांचा वेळ, पैसा, आणि त्रास देखील वाचला आहे. मात्र 470 महिलांना पैकी 30 टक्के महिलांना ऑनलाईन अर्ज भरताना त्रास होत आहे. संत गजानन महाराज सेवा समितीच्या या उपक्रमाचा ग्रामस्थांनी सुद्धा कौतुक केले आहे. महिलांनी देखील या संस्थेचे आभार मानले आहेत.
नागपूरात लागले होर्डिंग
नागपूर शहरातील सहाही विधानसभेत ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने‘चे होर्डिंग्ज उभारले आहेत. विधानसभा निवडणूकीपूर्वी लाडकी बहिण योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महिला आणि बालकल्याण विभागातर्फे हे होर्डींग बसविण्यात आले आहेत. नागपूरातील 6 विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा या योजनेच्या प्रसारासाठी लागली आहे. शनिवार आणि रविवारी देखील मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे ॲाफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.