Ashok Chavan | काँग्रेस का सोडली, भाजपमध्ये प्रवेश का केला?; अशोक चव्हाण यांनी सांगितली आतली बातमी

गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आज दुपारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. भाजप प्रवेशाचं कारणही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Ashok Chavan | काँग्रेस का सोडली, भाजपमध्ये प्रवेश का केला?; अशोक चव्हाण यांनी सांगितली आतली बातमी
Follow us
| Updated on: Feb 13, 2024 | 2:11 PM

मुंबई | 13 फेब्रुवारी 2024 : गेली अनेक दशके काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले, ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आज दुपारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. भाजपच्या प्रदेश कार्यालयात आज हा पक्षप्रवेश पार पडला. ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर मी इम्प्रेस आहे. मी प्रभावित आहे. त्यामुळे मी पक्षात प्रवेश करत आहे’, असा शब्दांत अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाचे कारण स्पष्ट केले

अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर दोन दिवसात निर्णय घेऊ, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. पण ते आजच भाजपवासी झाले. अमर राजूरकर हेदेखील अशोक चव्हाण यांच्यासोबतच भाजपमध्ये गेले आहेत. काल चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजूरकर यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. साहेब जिथे जाणार तिथे मी त्यांच्यासोबत असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार आज अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशादरम्यान राजूरकर हे देखील उपस्थित होते. चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखीही काही आमदार त्यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा कालपासून सुरू होती.

मोदींच्या कामाचे केले कौतुक

पक्ष सोडल्यावर अनेक सहकारी विरोधी बोलत आहेत. काहींनी समर्थन करत आहे. पण मी कुणावर वैयक्तिक टीका करणार आहे. मला बावनकुळे यांनी पक्षप्रवेश दिला. मी फिस दिली. उधार ठेवली नाही. मोदींनी ‘ सबका साथ सबका विकास’ हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. फडणवीस यांनीही आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे.

मोदींनी सबका साथ सबका विकास हे ब्रीद ठेवून अनेक कामे केली. आम्ही मोदींच्या कामावर इम्प्रेस झालो आहे. आम्ही विरोधात असतानाही आम्ही वैयक्तिक टीका केली नाही. आम्ही चांगल्या कामाचं कौतुक केलं. फडणवीस यांनीही आमच्याही कामाचं कौतुक केलं आहे.

आजच का झाला पक्ष प्रवेश ?

केंद्रीय मंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला मुंबईत येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार होता. मात्र भाजपकडून अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचं आश्वासन मिळालं आहे. पण राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उद्या ते राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करतील.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.