PHOTO : मुंबईत बेस्ट बसला अपघात, चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बस थेट भाजीच्या दुकानात
मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनसमोर एका बेस्ट बसला अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने कोणीही प्रवासी यात जखमी झाला नाही. (Mumbai Best Bus Accident near Chembur)
Follow us
मुंबईतील चेंबूर पोलीस स्टेशनसमोरील बसंत पार्क येथे एका बेस्ट बसला अपघात झाला आहे.
या बसमध्ये 10 ते 12 प्रवासी होते. मात्र सुदैवाने यात कोणताही प्रवासी जखमी झाले नाही.
बस क्रमांक 381 ला सकाळी 10.45 च्या सुमारास अपघात झाला आहे.
ही बस घाटकोपर स्थानक पूर्व येथून टाटा वीज केंद्र चेंबूर येथे जात होती.
बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला.
अपघातानंतर ही बस फुटपाथवरील भाजीच्या दुकान आदळली.
या अपघातानंतर बस चालक हरिदास पाटील यांना घाटकोपर जवळील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.