शेतकऱ्याचा नावाखाली बेकायदेशीर व्यापार, केंद्राच्या आदेशाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा विरोध

शेतकऱ्याचा नावाखाली बोरीवली, कुर्ला अनेक ठिकाणी बेकायदेशीर व्यापार चालू आहे. केंद्राने आदेश काढला, या आदेशाच्या संदर्भात एक नोटिफीकेशन काढलं आहे. आमचा त्यालाच विरोध आहे.

शेतकऱ्याचा नावाखाली बेकायदेशीर व्यापार, केंद्राच्या आदेशाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा विरोध
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 12:45 AM

नवी मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 5 महिने लांबणीवर पडली होती (Mumbai Krishi Utpann Bazar Samiti Sanchalak Mandal). अखेर या निवडणुकीसाठी मुहूर्त सापडला असून आज (31 ऑगस्ट) रोजी ही निवडणूक पार पडली. मराठावाडा महसूल विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक गोविंदराव डक यांना बिनविरोध सभापती पदासाठी निवडून देण्यात आले आहे. तर, पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय वाडकर यांना मुंबई एपीमसीच्या उपसभापती पदासाठी बिनविरोध निवडून देण्यात आले आहे (Mumbai Krishi Utpann Bazar Samiti Sanchalak Mandal).

बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला. भाजपने अनेक प्रयत्न केले. परंतु त्याठिकाणी त्यांना यश आले नाही. सभापती, उपसभापतीची निवड ही महाविकास आघाडीसाठी ऐकतेचं दर्शन आहे.

पहिला जो संघर्ष आहे, तो केंद्राने पारित केलेल्या एका आदेशाबद्दलचा आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला सूट मिळावी, म्हणून हा आदेश पारित केला आहे. पूर्वीपासून शेतकऱ्याच्या मालाला कोणतीही नियमावली नाही. मार्केटमध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकरी, माथाडी कामगार यांना न्याय मिळायचा, असं शिंदे यावेळी म्हणाले.

मात्र आता शेतकऱ्याचा नावाखाली बोरीवली, कुर्ला अनेक ठिकाणी बेकायदेशीर व्यापार चालू आहे. केंद्राने आदेश काढला, या आदेशाच्या संदर्भात एक नोटिफीकेशन काढलं आहे. आमचा त्यालाच विरोध आहे.

सरकारने सहकार संपवण्याच्या प्रयत्न चालू केला आहे. यामध्ये बँका, बाजार समित्या या शेतकऱ्यांशी संबधित आहेत. आमची लढाई शेतकऱ्यांच्या विरोधात नसेल, तर ती आमच्याशी स्पर्धा करणाऱ्या मोठ्या आतंरराष्ट्रीय कंपन्याशी असेल. या पद्धतीचा ठराव सगळ्या संचालकांनी मिळून पारीत केला आहे. या बाजारसमितीचे आव्हान असणार आहे की, पूर्वी बाजारसमिती ज्यापद्धतीने होती, तशी करावी लागेल. आम्ही शेतकऱ्यांना प्राधान्य देऊ. व्यापाऱ्यांशी समनव्य साधून मोडकळीस आलेल्या इमारती ज्या आहेत त्याची पुनर्बांधणी करण्याचा संदर्भात निर्णय नवीन मंडळांनी घेतला, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिली (Mumbai Krishi Utpann Bazar Samiti Sanchalak Mandal).

दरम्यान, पूर्ण राज्य आणि देश कोव्हिडच्या महामारीने ग्रासलेला असताना या कठीण प्रसंगी आमची निवड झाली. तरी आम्ही शेतकऱ्याचं हीत, व्यापाऱ्यांमधील समन्वय या दोघांमधील दुवा म्हणून या कठीण प्रसंगी जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल याला प्राधान्य देऊ.

सर्व संचालक मंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना एक सविस्तर निवेदन दिलं. महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे आम्हाला जाचक कायद्यावर परिणामकारक उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे.

एपीएमसी मार्केटमधील जे काही प्रलंबित प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांचा पाठपुरावा करुन हे प्रश्न निकाली लावू. तसेच धोकादायक असलेल्या इमारती संदर्भात व्यापाऱ्यांशी समन्वय साधून पुनर्बांधणी करण्याच्या संदर्भात निर्णय नवीन मंडळ घेईल. अशी प्रतिक्रिया मुंबई कृषी उपन्न बाजार समिती सभापती अशोक डक यांनी दिली (Mumbai Krishi Utpann Bazar Samiti Sanchalak Mandal).

संबंधित बातम्या :

मुंबई एपीएमसीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचा डंका, बारामतीचे जावई बिनविरोध

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.