नोकरीच्या अपेक्षेने ऑनलाईन व्यवहारातील एक चूक महागात, मुंबईकर महिलेला आठ लाखांचा गंडा
प्रोसेसिंग फी भरण्यासाठी ओटीपी मागून जॉब पोर्टलवरील व्यक्तीने मुंबईकर महिलेच्या खात्यातून आठ लाख काढले

मुंबई : नोकरीच्या अपेक्षेने ऑनलाईन व्यवहार करताना बाळगलेली निष्काळजी मुंबईकर महिलेच्या चांगलीच महागात पडली आहे. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली दहा रुपये भरताना ओटीपी सांगितल्याने महिलेच्या खात्यातील आठ लाख रुपये वजा झाले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दिल्लीच्या पाच ठगांना बेड्या ठोकल्या आहेत. (Mumbai lady gives OTP to job portal man withdraws eight lac)
मुंबईतील घाटकोपर भागात राहणाऱ्या तक्रारदार महिलेने www.shine.com या वेबसाईटवर आपला बायोडेटा अपलोड केला होता. नोकरीच्या अपेक्षेने तिने आपलं नाव नोंदवलं होतं. तिची प्रोफाईल पाहून एका व्यक्तीचा फोन आला. मी ‘शाईन.कॉम’मधून बोलत आहे, असे सांगून त्याने महिलेला तिच्या प्रोफाईलनुसार जॉब मिळवून देण्याचं आमिष दाखवलं.
ओटीपी देण्याची चूक अंगलट
प्रोसेसिंग फी म्हणून दहा रुपये ऑनलाईन भरावे लागतील, अशी बतावणी तिला करण्यात आली. फोनवर संभाषण करणाऱ्या व्यक्तीने महिलेला आपल्या बोलण्यात पुरते गुंतवले. आधी त्याने तिच्याकडे बँकेचे अकाऊण्ट डिटेल्स मागितले. त्यानंतर प्रोसेसिंग फी भरण्यासाठी ओटीपी मागून घेतला.
ओटीपी दिल्यानंतर घडलेल्या प्रकाराने महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. बँकेकडून आलेल्या मेसेजमुळे आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिच्या खात्यातून दहा रुपये नाही, तर तब्बल आठ लाख रुपये काढण्यात आले होते. महिलेने भानावर येत तातडीने पंतनगर पोलिस स्टेशन गाठलं. एफआयआर दाखल झाल्यानंतर पंतनगर पोलिसांनी या प्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.
दिल्लीचे पाच ठग अटकेत
दिल्लीत बसून याच मोडस ऑपरेंडीने ही गँग अनेकांची फसवणूक करत होती. दहा रुपये अकाऊंटमधून वळते करण्याच्या नावे मोठमोठी रक्कम काढून घेतली जात होती. अटक झालेल्या व्यक्तींपैकी चौघे जण दिल्लीचे, तर एक उत्तर प्रदेशचा आहे. (Mumbai lady gives OTP to job portal man withdraws eight lac)
पोलिसांनी आरोपींकडून 8 हार्डडिस्क, 23 मोबाईल, 47 सिमकार्ड, 12 डेबिट कार्ड, 11 पेटीएम कार्ड, 7 डोंगल, 3 सीडी, 2 पॅन कार्ड आणि 52 सिमकार्डची केस कव्हर याच्यासह अन्य लाखोंचं सामान जप्त केले आहे. त्यामुळे देशभरात किती ठिकाणी यांनी लोकांची फसवणूक केली आहे, याचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
वडिलांचा ओरडण्याचा राग मनात ठेऊन हत्या, मग ‘क्राईम पेट्रोल’ बघून मृतदेह रॉकेल टाकून पेटवलाhttps://t.co/e40OI5mo0T
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2020
संबंधित बातम्या :
सावधान! नोकरीच्या आमिषाने ऑनलाईन फसवणूक, वसईत दोन लाखांचा गंडा
Fact Check : कोरोना संकटात बेरोजगारांना नोकरी देतंय कृषी मंत्रालय! जाणून घ्या सत्य
(Mumbai lady gives OTP to job portal man withdraws eight lac)