मुंबई : मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रोच्या क्रेनचा भीषण अपघात झाला. यात बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. ही मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे येथे घेऊन जात होते. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात क्रेनचे दोन तुकडे झाले. (Mumbai Metro Crane accident Women Died at Andheri)
मुंबईतील अंधेरी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आज सकाळी 6 वाजता मेट्रोची क्रेन कोसळून भीषण दुर्घटना घडली. मेट्रोची क्रेन जोगेश्वरीहून वांद्रे या ठिकाणी घेऊन जात होते. मात्र चालकाचे क्रेनवर नियंत्रण सुटल्याने ती क्रेन मेट्रोच्या पिलरला जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की त्या क्रेनचे दोन तुकडे झाले. अंधेरीतील गुंदावली बस स्टॉपजवळ हा अपघात झाला.
यावेळी बस स्टॉपवर बस पकडण्यासाठी उभ्या असलेल्या एका महिलेच्या अंगावर त्या क्रेनचा एक भाग कोसळला. त्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. फाल्गुनी पटेल असे या मृत महिलेचे नाव सांगितले जात आहे. या महिलेसोबत बस स्टॉपवर उभे असलेले इतर दोन व्यक्तीही जखमी झाले आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान या दुर्घटनेनंतर क्रेनच्या चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. सध्या घटनास्थळी पोलीस चौकशी करत आहेत. तसेच या चालकाविरुद्ध इतर कारवाईचे आदेश नेण्यात आले आहेत.(Mumbai Metro Crane accident Women Died at Andheri)
संबंधित बातम्या :
तुमची जगभरात वाहवा, कठीण काळातही भन्नाट काम, मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून तोंडभरुन कौतुक
संयमाचे बक्षीस! महिलेच्या मारहाणीनंतरही धैर्य, हवालदार एकनाथ पार्टे यांचा गृहमंत्र्यांकडून सत्कार