केतकी चितळेविरोधात अश्लिल कमेंट करणाऱ्या आणखी चार जणांना अटक

अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या आणखी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सतीश केशव नरोडे (23), अक्षय विजय बुराडे (25), पंकज महादेव पाटील (26), निनाद विलास पारकर(26) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

केतकी चितळेविरोधात अश्लिल कमेंट करणाऱ्या आणखी चार जणांना अटक
Follow us
| Updated on: Jun 28, 2019 | 8:46 AM

मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या आणखी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काल (27 जून) मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादेत जाऊन सतीश केशव नरोडे (23) नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी आणखी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अक्षय विजय बुराडे (25), पंकज महादेव पाटील (26), निनाद विलास पारकर(26) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान केतकीच्या व्हिडीओखाली अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या इतर लोकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांशी गप्पा करताना मराठी ऐवजी हिंदी भाषेचा उपयोग केला. त्यावेळी तिने फेसबूक लाईव्ह सुरु असताना मराठीचा अट्टाहास करत कमेंट करणाऱ्यांना तिने उपरोधिक टोलाही लगावला होता. त्यावरुनच केतकीला अश्लील भाषेत ट्रोलिंग करण्यात आले होते. या ट्रोलर्सना केतकी चितळेने तोडीस तोड उत्तर दिलं होतं.

दरम्यान यानंतर केतकीने गोरेगाव पोलीस ठाण्यात या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या व्हिडीओवर अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार काल (28 जून) गोरेगाव पोलिसांनी थेट औरंगाबादमधील सतीश नरोडे (23) याला 23 जूनला अटक केली होती. या व्यतिरिक्त अक्षय विजय बुराडे ( 25) याला 26 जूनला उल्हासनगरहून, पंकज महादेव पाटील (26) याला 27 जूनला कोल्हापुरहून आणि निनाद विलास पारकर (26) याला मुंबईतून अटक केली आहे.  या सर्वांवर 354/ड , 500, 504, 506, 507, 509, 67 ITI हे कलम लावण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. “राज ठाकरेंनी स्वतःहून बोलवले आणि माझ्या धाडसाचे अभिनंदन केले. महिलांच्या दबलेल्या आवाजाला वाव मिळाला. त्यासाठी राज ठाकरेंनी माझे अभिनंदन केले”, अशी माहिती केतकी चितळेने दिली होती. त्याशिवाय तिने मंगळवारी (18 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

काय आहे नेमकं प्रकरण?

अभिनेत्री केतकी चितळेने काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हवरुन गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी तिने  हिंदीत संवाद साधला होता. मात्र त्यापूर्वी तिने आपण हिंदी का बोलणार आहोत हे सांगितलं होतं. तसंच मी मराठी आहे म्हणून मराठीच बोलायला हवं असा सल्ला देऊ नका, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, असंही केतकीने म्हटलं होतं. मात्र तिच्या फेसबुक लाईव्हदरम्यान अनेकांनी अश्लिल कमेंट केल्या होत्या. अनेकांनी बलात्काराचीही धमकी दिली.

ट्रोलर्सच्या या कमेंटसना केतकीने पुन्हा फेसबुक लाईव्ह करुन उत्तर दिलं होतं.  ती म्हणाली, “मी एका व्हिडीओत मराठीविषयी बोलले नाही. जाहीर प्रेम दाखवले नाही, मी मराठी, मी मराठीचा बाणा लावला नाही, झेंडे फडफडवले नाही तर माझी मातृ आणि पितृ भाषा मोडकळीला लागेल, एवढी ती तकलादू नाही. मला माझ्या भाषेवर प्रेम दाखवावे लागत नाही. आता मला लाज वाटते महाराष्ट्र माझा म्हणायला. एकाच स्त्रीचा निषेध करायला तिच्यावर अश्लील भाषेत शेरेबाजी करावी लागते, शिवीगाळ करावी लागते, तिचा बलात्कार करावा लागतो, असा महाराष्ट्र माझा नाही”

आधीच्या व्हिडीओत काय म्हणाली होती?

केतकीने आपल्या आधीच्या व्हिडीओत म्हटले होते, “मी माझ्या मराठी बांधवांना सुरुवातीलाच सांगू इच्छिते की मला फक्त मराठी भाषिक लोक फॉलो करत नाही, तर इतर भाषिक लोकही फॉलो करतात. त्यामुळे आजचा व्हिडीओ हिंदी आणि इंग्लिशमध्ये असेल. त्यामुळे कृपया मराठीचे झेंडे फडफडवून नका. हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. कमीतकमी ती तुम्हाला येणं अपेक्षित आहे. म्हणून कृपया कमेंटमध्ये मराठी विसलीस का? असे म्हणू नका, असे तिने म्हटलं होतं.

संबंधित बातम्या 

केतकी चितळेविरोधात अश्लिल कमेंट, सतिश पाटीलला औरंगाबादेतून अटक

रेपची धमकी देणारा महाराष्ट्र माझा असू शकत नाही, ट्रोलर्सना केतकी चितळेची सडेतोड उत्तरं  

ट्रोलिंग प्रकरणानंतर अभिनेत्री केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 

राज ठाकरेंनी स्वत:हून बोलावून माझं कौतुक केलं : केतकी चितळे

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.