कर्ज देण्याच्या बहाण्याने ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक, 5 जण अटकेत
कर्ज देण्याच्या बहाण्याने अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका टोळीच्या (Mumbai police arrest fraud loan lending Gang) भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबई : कर्ज देण्याच्या बहाण्याने अमेरिकन नागरिकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका टोळीच्या (Mumbai police arrest fraud loan lending Gang) भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका कॉल सेंटरच्या माध्यमातून ही फसवणूक करत असल्याचे समोर आलं आहे.
वित्त संस्थांकडून कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवून अमेरिकेतील ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे. जोगेश्वरीतील प्रेमनगर भागात बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या कॉल सेंटरवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. मोहसीन शमसुद्दिन सय्यद, रमिज रफिक शेख, अरबाज अमलउल्लाह अन्सारी, उमेर शफीक मीर, मोहम्मद अफशान शेख असे अटक आरोपींची नावे (Mumbai police arrest fraud loan lending Gang) आहेत.
ओव्हन्स अमेरिका या कंपनीच्या ग्राहकांची माहिती अफशान हा इतर मोहसीन याला पुरवत असे. या माहितीचे विश्लेषण करुन मोहसीन आणि त्याचे इतर तीन साथीदार कर्ज हवे असलेल्या नागरिकांना लक्ष करत. दर दिवशी जवळपास 100 ग्राहकांचे फोन क्रमांक दिले जात. ग्राहकांना फोन करुन अथवा संदेश पाठवून कर्ज हवे का? अशी विचारणा केली जात.
कर्ज मंजुरीसाठी त्यांचा सोशल सिक्युरिटी कोड कॅश नियॉन या अॅपमध्ये टाकल्यावर त्या ग्राहकांची संपूर्ण माहिती मिळायची. या माहितीच्या आधारे ग्राहकाला तुमचा क्रेडिट स्कोअर कमी झाला असून कर्ज हवं असल्यास सेक्युरिटी डिपॉझिट जमा करावे लागेल असे सांगितले (Mumbai police arrest fraud loan lending Gang) जायचं.
ग्राहकाला हे सिक्युरिट डिपॉझिट हे वॉल-मार्ट, गेम स्टॉप, गुगल पे यांच्या गिफ्टकार्डच्या स्वरुपात द्यायला सांगितले जात. या गिफ्टकार्डचा फोटो घेऊन ते पैसे आपल्या खात्यात वळवले जात. यातील प्रत्येकी एक डॉलरमागे अफशान हा मोहसिनला 20 रुपये देत असेही यावेळी समोर आले.
या कॉल सेंटर घातलेल्या धाडीत पोलिसांनी 3 लॅपटॉप, 2 राऊटर, 6 मॅजिक जॅक डिवाईस, 4 हेडफोन, 6 मोबाईल फोन जप्त केले आहेत. तर अफशानच्या घरी छापा टाकून पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लॅपटॉप आणि 6 मोबाईल जप्त केले. दरम्यान यातील काही आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली (Mumbai police arrest fraud loan lending Gang) जात आहे.