Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका

लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या डान्स बारवर मुंबई पोलिसांनी काल (9 ऑक्टोबर) धाड टाकली (Police action on Dance Bar).

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका
Follow us
| Updated on: Oct 10, 2020 | 1:00 PM

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या डान्स बारवर मुंबई पोलिसांनी काल (9 ऑक्टोबर) धाड टाकली (Police action on Dance Bar). यावेळी पोलिसांनी 15 ग्राहकांसह 20 जणांना अटक केली आहे. गोरेगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी या बारमधील तळ घरातून 11 मुलींची सूटका केली आहे (Police action on Dance Bar).

पोलिसांनी गोरेगाव येथील एका डान्स बारवर कारवाई केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री 1 वाजता पोलिसांनी बारवर छापा मारला. त्यावेळी डान्स बारमध्ये एकूण 11 मुली डान्स करत होत्या, असं पोलिसांनी सांगितले.

आम्हाला माहिती मिळाली होती की, लॉकडाऊमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्स बार सुरु होता. त्यानंतर डीसीपी विशाल ठाकूर यांनी एक पथक पाठवून बारवर छापा मारला. तर 11 पीडित मुलींची यामधून सूटका केली. वेटर, सुपरव्हायजर, कॅशिअर आणि मॅनेजरलाही पोलिसांनी अटक केली आहे.

राज्यात 5 ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहेत. पण जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नियमांचं पालन गेलं नाही तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. कारण, नियमांचं पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे, असंही शासनाकडून सांगण्यात आले होते.

नियम मोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने हॉटेल व्यावसायिकांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यानुसारच हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. या नियमांचं हॉटेल चालकांकडून पालन होतं आहे की नाही, हे पाहण्यासाठी पथकं स्थापन केली जाणार आहेत. ही पथकं हॉटेलची तपासणी करणार असून यामध्ये नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 50 हजार रुपयांचा दंडाची कारवाई करण्यात येणार आहे.

तसंच, दुसऱ्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास हॉटेल परवाना काही दिवसांसाठी निलंबित आणि जर तिसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन झाल्यास हॉटेल व्यवसायाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त सौरभ राव यांनी दिली.

संबंधित बातम्या :

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द

Maharashtra Unlock 5 | Hotels Reopen | राज्यात आजपासून 50 % क्षमतेने हॉटेल, रेस्टॉरंट ,बार सुरु

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.