Rishi Kapoor died | मुंबई पोलिसांची ऋषी कपूर यांना अनोखी श्रद्धांजली!!

मुंबई पोलिसांनीही अनोख्या पद्धतीने ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली (Rishi Kapoor died Mumbai Police Tweet) वाहिली.

Rishi Kapoor died | मुंबई पोलिसांची ऋषी कपूर यांना अनोखी श्रद्धांजली!!
Follow us
| Updated on: Apr 30, 2020 | 2:30 PM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज (30 एप्रिल) मुंबईत निधन (Rishi Kapoor died Mumbai Police Tweet) झाले. ते 67 वर्षांचे होते. कर्करोगावरील उपचारादरम्यान ऋषी कपूर यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह, राजकीय क्षेत्र, क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त केली. मुंबई पोलिसांनीही अनोख्या पद्धतीने ट्विट करत ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

फुड-फिल्मस-फ्रेंड्स चा “दिवाना” असणारा, “खेल खेल मे”, “हम किसीसे कम नहीं” बोलणारा, “सागर” ची “सरगम” गाणारा, “बॉबी” बनून “बोल राधा बोल” म्हणणारा, “लव्ह आज कल” च्या “अग्निपथ” वर चालणारा…. आज सगळ्यांना “कर्ज” मध्ये ठेवून परदेसी हो गया…, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.

यात ऋषी कपूर यांचे सर्व गाजलेल्या चित्रपटांची नावं लिहिली आहेत. अशा अनोख्या पद्धतीने मुंबई पोलिसांनी ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“भारतीय चित्रपट सृष्टीसाठी मोठे योगदान देणाऱ्या घराण्याचा वारसा असणारे, स्वतंत्र प्रतिभेचे, मनस्वी आणि निखळ अभिनेते ऋषी कपूर यांच्या जाण्याने कला क्षेत्राची हानी झाली आहे. ते चित्रपट सृष्टीतील दोन पिढ्यांच्या दरम्यान मार्गदर्शक दूवा होते, हा दूवा निखळला आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनेता ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली.

ऋषी कपूर यांचा परिचय

ऋषी कपूर यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईतील चेंबूरमध्ये  झाला होता. त्यांचे खरे नाव ऋषीराज कपूर. ऋषी कपूर हे द ग्रेट शोमन राज कपूर आणि कृष्णा राज कपूर यांचे पुत्र, तर दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचे नातू. मुंबईतील चॅम्पियन स्कूलमध्ये ऋषी कपूर यांचं शिक्षण झालं. ‘चिंटू’ या टोपणनावाने ते कपूर कुटुंबासह चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होते.

ऋषी कपूर यांनी 1970 साली प्रदर्शित झालेल्या ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 1973 मध्ये  प्रदर्शित झालेल्या ‘बॉबी’ चित्रपटाने ऋषी कपूर यांना खरी ओळख मिळवून दिली. बॉबी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

ऋषी कपूर यांनी जवळपास 120 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत गाजवला होता.  2008 मध्ये फिल्मफेअर लाइफटाइम अचिवमेंट पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले (Rishi Kapoor died Mumbai Police Tweet) होते.

संबंधित बातम्या :

Rishi Kapoor died | पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त, सिनेकलाकारही हळहळले

Rishi Kapoor | बॉबी ते नगिना, ऋषी कपूर यांचे गाजलेले चित्रपट

Rishi Kapoor | बॉलिवूडचा ‘चॉकलेट हिरो’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.