अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. पटेल आतापर्यंत 8 वेळा खासदार राहिले आहेत. त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत 5 तर लोकसभेत 3 वेळा त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

अहमद पटेल यांचं दु:खद निधन, गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे 'चाणक्य' पर्यंतचा प्रवास
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 10:02 AM

नवी दिल्ली: काँग्रेसचं पहिल्या फळीतील मोठं नाव, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं आज पहाटेच्या सुमारास दु:खद निधन झालं. अहमद पटेल यांना 1 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. 15 नोव्हेंबरला प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, शरिरातील अनेक अवयव निकामी झाल्यामुळे आज पहाटे 3.30 वा. त्यांची प्राणज्योत मालवली. ते 71 वर्षांचे होते. अहमद पटेल यांच्या मृत्यूची माहिती त्यांचा मुलगा फैजल यांनी दिली आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आखून देण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करण्याचं आवाहन फैजल यांनी जनतेला केलं आहे. (Ahmed Patel’s political journey)

अहमद पटेल यांची यशस्वी राजकीय कारकिर्द

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. पटेल आतापर्यंत 8 वेळा खासदार राहिले आहेत. त्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत 5 तर लोकसभेत 3 वेळा त्यांनी काँग्रेसचं प्रतिनिधित्व केलं. वयाच्या 26 व्या वर्षी त्यांनी गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. पटेल यांची ऑगस्ट 2018 मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पटेल यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमान सांभाळण्याचं मोठं काम केलं आहे.

सत्ता उपभोगण्यापेक्षा पक्षसंघटनेवर भर

1977च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यावेळी काँग्रेसच्या मुठभर विजयी उमेदवारांमध्ये अहमद पटेल यांचं नाव होतं. पुढे 1980 मध्ये काँग्रेसनं दमदार पुनरागमन केलं. त्यावेळी इंदिरा गांधी अहमद पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक होत्या. पण पटेल यांनी आपण संघटना मजबूत करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत पक्षासाठी काम करणं पसंत केलं. त्यानंतर राजीव गांधी यांनीही 1984च्या निवडणुकीनंतर पटेल यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही पटेल यांनी ते विनम्रपणे नाकारत पक्षासाठी काम करण्यालाच पसंती दिली. राजीव गांधी यांच्या काळात अहमद पटेल यांनी काँग्रेसमध्ये युवकांचं संघटन बांधलं. त्याचा मोठा फायदा पुढे सोनिया गांधी यांना झाला.

पटेल यांचा राजकीय प्रवास

अहमद पटेल यांचा जन्मा गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला. 1977 मध्ये त्यांनी आपली पहिली लोकसभा निवडणूक लढली आणि जवळपास 62 हजार मतांनी ते विजयी झाले. 1980 मध्ये त्यांनी 82 हजार मतांनी विजय मिळवला. तर 1984च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 1 लाख 23 हजार मतांनी विजय झाला. पुढे 1993 पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले.

1977 ते 1982 दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती. तर 1983 ते 1984 असं एक वर्ष त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं जॉईंट सेक्रेटरी पद सांभाळलं. पुढे 1985 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान पटेल माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव राहिले. जानेवारी 1986 मध्ये त्यांच्यावर गुजरात काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. 1991 मध्ये नरसिंह राव पंतप्रधान झाल्यानंतर पटेल यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचा सदस्य बनवण्यात आलं. 1996 मध्ये त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं कोषाध्यक्ष बनवण्यात आलं होतं. पण काही कारणांमुळे त्यांनी ते पद सोडलं. पुढे 2000 साली सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून पटेल यांनी कारकिर्द गाजवली. संघटनेसोबतच पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे बनवण्यात आलेल्या कमिटीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे.

काँग्रसचे चाणक्य

अहमद पटेल यांना 10 जनपथचा चाणक्य म्हणून ओळखलं जायचं. ते गांधी परिवाराचे निकटवर्तीय आणि काँग्रेसमध्ये गांधी परिवारानंतर नंबर 2 चे नेते होते. काँग्रेस पक्षावर त्यांची पकड अतिशय मजबूत होती. राहुल गांधी यांनाही सातत्यानं अहमद पटेल यांचा सल्ला घ्यावा लागत होता. 2018 मध्ये अहमद पटेल यांनी गुजरातमधून राज्यसभेची निवडणूक लढवली. त्यांचा पराजय करण्यासाठी भाजपनं आपली सर्व ताकद पणाला लावली होती. तरीही अमहद पटेल यांनी 44 मतं घेत विजय मिळवला आणि भाजपचे उमेदवार बलवंत सिंह राजपूत यांना 38 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.

संबंधित बातम्या:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार अहमद पटेल यांचे निधन, मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरद्वारे माहिती

Ahmed Patel | काँग्रेसचे दिग्गज नेते अहमद पटेल आयसीयूमध्ये

Ahmed Patel’s political journey

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.