साताऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Mumbai Pune Express Way ST Bus Accident)

साताऱ्यातून मुंबईकडे येणाऱ्या एसटीला अवजड वाहनाची जोरदार धडक, एकाचा मृत्यू, 16 जण गंभीर
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 7:56 AM

रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  (Mumbai Pune Express Way ST Bus Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली बस ही साताऱ्यातून मुंबईकडे येत होती. त्यावेळी अचानक एका ट्रेलर किंवा ट्रक यासारख्या अवजड वाहनाने एसटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला. यामुळे झोपेत असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन जुन्या एक्सप्रेस वे वर जाताना येणाऱ्या पनवेल एक्झिटजवळ हा अपघात झाला. ही बस पुण्याहून मुंबईत येत होती. त्याचवेळी रात्री 1.30 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही मृत व्यक्ती ही मुंबईतील बेस्टचे चालक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात बस चालकासह 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तात्काळ IRB यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस पळस्पे टँप यांनी MGM रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व जखमींवर कामोठेतील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातातील जखमींवर पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर पनवेल डेपोतील अधिकारी वर्ग रुग्णालयात उपस्थित आहे. हे सर्व जण जखमीची काळजी घेत आहेत. (Mumbai Pune Express Way ST Bus Accident)

संबंधित बातम्या : 

ट्रेकिंग करताय तर सावधान! या 3 तरुणांसोबत घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

कळसुबाई शिखरावर तिरंगी झेंड्याद्वारे साकारला महाराष्ट्राचा नकाशा, शहीद जवानांना अनोखी आदरांजली

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.