रेल्वे डब्यांचं रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना सज्जतेसाठी मुंबईकराचं मोदींना पत्र

रेल्वेच्या डब्यांचं रुग्णालयात रुपांतर करा, अशी मागणी मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील किरण कुपेकर (kiran kupekar written letter to PM modi) यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

रेल्वे डब्यांचं रुग्णालयात रुपांतर करा, कोरोना सज्जतेसाठी मुंबईकराचं मोदींना पत्र
Follow us
| Updated on: Mar 28, 2020 | 1:28 PM

मुंबई : रेल्वेच्या डब्यांचं रुग्णालयात रुपांतर करा, अशी मागणी मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वेकडील किरण कुपेकर (kiran kupekar written letter to PM modi) यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 25 मार्च 2020 रोजी कुपेकर यांनी हे पत्र मोदींना लिहिले होते. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयातून कुपेकर यांच्या पत्राची दखल घेत त्या पद्धतीचे उत्तर त्यांना (kiran kupekar written letter to PM modi) देण्यात आलं आहे.

“रेल्वे डब्यांमध्ये हॉस्पिटलसाठी लागणाऱ्या बहुतेक सुविधा असतात. उदा. टॉयलेट, बेड इत्यादी जर काही रेल्वे डब्यांचं रूपांतर तात्पुरत्या रुग्णालयात केले तर कमी वेळात एक फार मोठी यंत्रणा सज्ज करता येईल आणि संपूर्ण देशभर कुठेही गरजेनुसार पाठवता येतील. रेल्वेचे डबे विलगिकरणासाठी (quarantine) पण उपयुक्त ठरतील. याकरिता रेल्वे उपयोगी ठरेल”, असं सूचित करणार पत्र किरण कुपेकर यांनी मोदींना पाठवले आहे.

भारतीय रेल्वेकडूनही कोरोना रोखण्यासाठी आता मदत केली जात आहे. रेल्वेकडून आता नॉन एसी ट्रेनच्या डब्ब्यात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. या ट्रेनमध्ये कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंनटाईन केले जाणार आहे. तसेच येथे त्यांच्या औषधांची आणि जेवणाचीही व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

“रेल्वेच्या डब्ब्यांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यासाठी केंद्राकडून परवानगी मिळाल्यास प्रत्येक आठवड्याला 10 डब्ब्यांचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केले जातील. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारला मदत मिळेल”, असं रेल्वेने सांगितले.

दरम्यान, देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या आता 160 वर पोहोचली आहे. तर देशात 800 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.