BREAKING | डोक्यात दगड घालून आणि गळा चिरुन तरुणाची हत्या, मिरजेतील धक्कादायक प्रकार
सांगली: मिरजमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरुन ही हत्या करण्यात आली आहे. गोविंदा मुत्तीकोळ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिरजमधील समता नगर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. सांगली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या हत्येमागील […]
सांगली: मिरजमध्ये एका तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरुन ही हत्या करण्यात आली आहे. गोविंदा मुत्तीकोळ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मिरजमधील समता नगर इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. सांगली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (murder of a youth in miraj in sangli district)
मृत गोविंदाची आई ही निवृत्त रेल्वे कर्मचारी आहे. गोविंदाला अंमली पदार्थांच्या सेवनाचं व्यसन होतं. तो आईसोबतच समतानगर इथं वास्तव्याला होता. रविवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास जुन्या हरिपूर रस्त्यावर 2 ते 3 हल्लेखोरांनी अत्यंत निर्घृणपणे गोविंदाची हत्या केली. धारदार शस्त्राने गळा चिरुन आणि डोक्यात दगड घालून ही हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी गोविंदा आणि त्याच्या अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मित्रांमध्ये झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
murder of a youth in miraj in sangli district