पहिल्यांदाच खासदार झाल्यावर मंत्रिपदी वर्णी कशी लागली?; मुरलीधर मोहोळांनी घटनाक्रम सांगितला

Murlidhar Mohol on Ministership and Pune Loksabha Election 2024 : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आले. तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी मंत्रिपद कसं मिळालं? यावर मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं. वाचा सविस्तर...

पहिल्यांदाच खासदार झाल्यावर मंत्रिपदी वर्णी कशी लागली?; मुरलीधर मोहोळांनी घटनाक्रम सांगितला
Follow us
| Updated on: Jun 15, 2024 | 7:48 PM

पुण्याचे खासदार राहिलेले मुरलीधर मोहोळ हे आता पुण्याचे खासदार झालेत. इतकंच नव्हे तर पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. पण पहिल्यांदाच खासदार अन् लगेच मंत्रिपदी वर्णी हे कसं काय शक्य झालं? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मोहोळ आज पहिल्यांदाच पुण्यात आले. तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मोहोळांच्या समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. तेव्हा टीव्ही 9 मराठीशी बोलताना खासदार ते मंत्रिपदापदाची माळ गळ्यात पडण्यापर्यंतचा घटनाक्रम सांगितला.

“सकाळी- सकाळी फोन आला आणि…”

खासदार झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधिच्या काळात सकाळी जे. पी. नड्डा यांच्या पीएचा मला फोन आला आणि जे पी नडा यांनी सांगितल की 11 वाजता पीएम हाऊसला बोलवलं आहे. मला विश्वास बसत नव्हता की खरंच मला असा फोन आलाय की काय? हे सगळं स्वप्नवत होतं. मग मी पंतप्रधानांच्या घरी गेलो. पीएम हाऊसला गेल्यावर वेगळं वाटलं. नरेंद्र मोदी म्हणाले की, कैसे हो पुणेकर…?, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

वरिष्ठांच्या विश्वासामुळे माझी मंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतानाचाही अनुभव खूप वेगळा होता. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहकार आणि नागरी विमान वाहतूक ही दोन खाती मला मिळाली. बिग बॉस बरोबर काम करायला मिळालं. पुण्याला एक नंबर करायचं आहे. पुणेकरांसाठी खूप काम करायचं आहे. आपल्याकडे मंत्रिपद आल्यानंतर पुणेकरांच्या अपेक्षा आता वाढल्या आहेत आणि ते स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यासाठी मेहनत करणार आहे, असं मुरलीधर मोहोळांनी सांगितलं.

अमित शाहांसोबतच्या भेटीवर काय म्हणाले?

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या स्वभावाविषयी आणि त्यांच्यासोबतच्या भेटीविषयी मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलंय. नवीन सहकार धोरण काल बैठक होती. ती झाली नाही. विमानतळाच्या संदर्भात मी भेटायला गेलो होतो. तेव्हा म्हणाले की मुरली आप पुणे गये नहीं हो क्या… म्हणाले की आप मीटिंग पोस्टपॉन हो गायी है आप जाके आ जाओ… कडक हेडमास्टर मिळालं आहे, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.