Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी

तब्लिगी जमाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली आहे (Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona ).

तब्लिगी जमातने देशाची माफी मागावी, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची मागणी
Follow us
| Updated on: Apr 07, 2020 | 8:43 PM

पुणे : तब्लिगी जमाच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवत मुस्लिम सत्यशोधक मंडळाने त्यांच्या जाहीर माफीची मागणी केली आहे (Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona ). मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी याबाबत मागणी केली आहे. दिल्लीतील निजामुद्दिन येथे मरकजमध्ये तब्लिगी जमातचा कर्तव्य पालनातील अधर्म पुढे आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येस तब्लिगी जमातचा बेजबबादारपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे तब्लिगीच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल मुस्लिम समाजातही असंतोष असल्याचं मत शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केलं आहे.

शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटलं आहे, “तब्लिगीच्या वर्तनावर टीका करत भारतातील धार्मिक तेढ वाढवण्यास कारणीभूत ठरेल असा मजकूर सोशल मीडियात फिरत होता. त्यामुळे समाजात संशय आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा खोट्या बनावट पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. तसेच पोलिस ठाण्यात काही गुन्हेही नोंदवण्यात आले. त्यामुळे समाजाला अनामिक भीतीपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला. आहे. राज ठाकरे यांनी तब्लिगीला गोळ्या घाला, असं प्रक्षोभक विधान केलं आहे. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर गाठ आमच्याशी आहे, असं म्हटलं. त्यामुळे पुन्हा समाजात घबराट निर्माण झाली आहे. सर्वसामान्य मुस्लिमांची असुरक्षितता वाढत असतानाच, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्लिगी जमातने ताबडतोब तोबानामा (माफीनामा) करुन संपूर्ण भारतीयांची माफी मागावी.”

येत्या बुधवारी शब्बे बारात आहे. या निमित्त लोक मस्जिदमध्ये नमाज अदा करतात आणि कबरस्थानात जावून प्रार्थना करतात. 15 दिवसानंतर रमजान महिना सूरु होत आहे. मुस्लिम समाजात रमजानला फार महत्व असते. महिनाभर उपास, नमाज, कुरान पठण केले जाते. ईदगाहवर जावून सामुदायिक नमाज आदा करणे, आप्तस्वकीय आणि समाजबांधवाना गळाभेट – अलिंगन दिले जाते. हे सर्व कोरोना विषाणु पसरवण्यात आणि कोरोनाग्रस्तांची संख्या वाढवण्यास कारणीभूत ठरु शकतात. मानवतेसमोरील या संकटास प्रतिबंध करण्यासाठी सर्व धार्मिक सण आणि श्रद्धा आपल्या घराच्या चार भिंतीच्या आत मर्यादीत ठेवाव्यात. शासन, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेचा आदर करुन सर्व नियमांचे पालन करावे, असं आवाहन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने केलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा गुणाकार, रुग्णांची संख्या हजार पार!

Pune Curfew | पुणे पोलिसांचं आणखी एक कडक पाऊल, शहरात 5 ठिकाणी कर्फ्यू लागू

बारामतीत कोरोनाचा विळखा वाढला, कोरोनाबाधित भाजी विक्रेत्याच्या मुलाला आणि सुनेला कोरोनाची लागण

Muslim Satyashodhak Mandal on Tablighi Jamaat amid Corona

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....