Solapur Corona | सोलापुरात मटण विक्रेत्याला कोरोना, 18 जण रुग्णालयात, 63 जण होम क्वारंटाईन
पोलीस, डॉक्टर, नगरसेवक, सामान्य नागरिकांबरोबर आता एका मटण विक्रेत्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे.
सोलापूर : सोलापुरात कोरोना संसर्गाचा प्रसार सुरुच (Mutton Seller Infected By Corona) आहे. पोलीस, डॉक्टर, नगरसेवक, सामान्य नागरिकांबरोबर आता एका मटण विक्रेत्यालाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मटणविक्रेत्याच्या मुलांसह 18 जणांना ताब्यात घेऊन उपचारासाठी दाखल केलं आहे. या मटण विक्रेत्याकडून मटण घेतल्याचं काही ग्राहकांना महागात पडलं आहे. तर जवळपास 63 जणांना होम क्वारंटाईन (Mutton Seller Infected By Corona) करण्यात आलं आहे.
सोलापुरातील मोरारज पेठ परिसरातील एका मटण विक्रेत्याला अवस्थ वस्तू लागल्याने त्याला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याच्याकडून मटण विकत घेणं आता ग्राहकांना महागात पडल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्याकडून किती जणांनी मटण विकत घेतले, या संदर्भातली माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे.
मात्र सध्या तरी त्याच्या दोन मुलांसह प्राथमिक संपर्कातील 18 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून 63 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Mutton Seller Infected By Corona).
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मटण आणि चिकन विक्रीवर निर्बंध आणण्यात आले आहेत. मात्र, असं असताना सुद्धा संबंधित मटण विक्रेत्याने ग्राहकांच्या मागणी प्रमाणे मटण आणि चिकनचा पुरवठा करत होता. त्यामुळे मटण शौकिनांची गर्दी त्याच्याकडे व्हायची.
मात्र, आता तो कोरोनाबाधित आढळल्यामुळे त्याच्याकडून मटण घेतलेल्या काही लोकांची तपासणी केली जाणार आहे. तर 63 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
Navi Mumbai Corona | नवी मुंबईत ‘कोरोना’चं थैमान सुरुच, रुग्ण संख्या 1,364 वरhttps://t.co/195J4rsLSj#CoronaInMaharashtra #coronavirusinindia #CoronaUpdates #APMCMarket
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 21, 2020
Mutton Seller Infected By Corona
संबंधित बातम्या :
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय
एकाच दिवसात राज्यात चार पोलीस कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना’ने बळी
कोरोना संकटात माजी अधिकाऱ्याने खजाना दाखवला, ठाकरे सरकारला हक्काचे 1 लाख कोटी मिळणार?