माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता? : शरद पवार

"माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 म्हणता". पवारांच्या या वाक्याने एकच हशा पिकला. Sharad Pawar talks on his age

माझं सर्वात मोठं ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 आहे, तुम्ही 85 का म्हणता? : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 25, 2020 | 3:24 PM

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी औरंगाबदमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. पवारांनी पत्रकार परिषदे घेऊन, औरंगाबादमधील कोरोना स्थितीची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांचं वय आणि ते राज्यभर फिरुन घेत असलेला आढावा, लातूर भूकंपावेळी पवारांनी घेतलेले निर्णय, याबाबत प्रश्न विचारलं. (Sharad Pawar talks on his age)

त्यावर पवार म्हणाले, “माझं सर्वात मोठं आणि तीव्र ऑब्जेक्शन आहे, माझं वय 80 असताना तुम्ही 85 म्हणता”. पवारांच्या या वाक्याने पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.

त्यानंतर पवार पुढे म्हणाले, “लातूरचा भूकंप होता, तो एका जिल्ह्यातील काही भागापुरता सिमीत होता. त्यावेळी तिथे जाऊन बसण्याची गरज होती. पण आताचं कोरोना संकट हे मोठं आहे, सबंध महाराष्ट्रात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले, तर अन्य जिल्ह्यातील तातडीने निर्णय घेण्याच्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे आमचा सर्वांचा आग्रह आहे की कॅप्टनने एका ठिकाणी बसून, सगळी टीम काम करते की नाही, त्यावर नियंत्रण ठेवावं. काही कमतरता असेल ती सांगावी. पालकमंत्री इथून गेले की ते मुख्यमंत्री आणि संबंधित घटकांशी उद्या बोलतील”

मुख्यमंत्री टीमकडून काम करुन घेत आहेत. सर्वांशी संवाद आणि समन्वय ठेवून मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावे लागतात. त्याप्रमाणे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. मी फिरतोय कारण मी सतत लोकांमध्ये जाणारा माणूस, मला एकाजागी बसवत नाही, असं शरद पवार म्हणाले.

अनेक जिल्हे आहेत, ज्यांनी मला खूप मदत केली. त्यामुळे तिथे संकट आल्यानंतर त्यांची चौकशी करणं, मदत करणं या भावनेने मी आलो आहे. उद्या मी मुंबईला गेलो की मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन, ज्या कमतरता आहेत, त्या सांगेन. माझी खात्री आहे, मुख्यमंत्री ताबडतोब निर्णय घेतील आणि त्याच पद्धतीने एवढ्या व्यापक संकटाला तोंड देणं आवश्यक आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.

(Sharad Pawar talks on his age)

संबंधित बातम्या 

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या राम मंदिराच्या विधानावर उद्धव ठाकरे म्हणतात…   

Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या कामात लक्ष द्यावं : शरद पवार 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.