Supriya Sule : मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं, तुमचा खासदार पारदर्शक आयुष्य जगतो, – सुप्रिय सुळे

तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं.. अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून सातत्याने टीका होत असते. त्याच टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं.

Supriya Sule :  मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं, तुमचा खासदार पारदर्शक आयुष्य जगतो, - सुप्रिय सुळे
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 12:50 PM

विनय जगताप, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी,  पुणे | 3 मार्च 2024 : तुमचा खासदार हा पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहिती असतं.. अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून सातत्याने टीका होत असते. त्याच टीकेला अप्रत्यक्षपण उत्तर देतानाच सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोला हाणला. बारामतीमधील पार पडलेल्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये त्या बोलत होत्या.

माझी पोर पण म्हणतात..

मी कुठे आहे हे 24 तास तुम्हाला माहीत असतं. माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई कुठंय ते.. सोशल मीडियावर दिसतंय आपली आई कुठल्या गावात भाषण करतीय ?.. कारण ही माझी नैतिक जबाबदारी आहे, असं सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या. आपला कारभार पारदर्शक आहे, असे सांगतानाच अप्रत्यक्षरित्या त्यांनी विरोधकांना टोलाच लगावला. हमारी सबसे बडी ताकद, हमारी इमानदारी है. आमचे विरोधकही म्हणतात, की आमचे मनभेद नाहीत आमचे मतभेद आहेत. पण हे दुर्दैव आहे की इतकं दूषित राजकारण आज झालंय, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांच्यासह अजित पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी आणि सोशल मीडिया वापरावरून टीका होत असते.. त्यावर सुळे यांनी भोर मधील महाविकास आघाडीच्या बैठकीदरम्यान बोलताना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय.

रोजगार मेळाव्यावर केली टीका

यावेळी सुप्रिया सुळे यांनी रोजगार मेळाव्यावर टीकाही केली. लोकसभा निवडणूक आली की हे मोठे मोठे मेळावे घेतात आणि ह्याला खर्च केंद्र सरकार करतं. या सगळ्या मधून जाहिरात कुणाची होत आहे ? तर यांच्या महायुतीची यामध्ये सरकारी यंत्रणेचा गैरवापर हा सातत्याने यांची जाहिरात करण्यासाठी होत आहे. हे मोठं दुर्दैव आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?
'निर्ढावलेले लोक महान...,' अजितदादा-शरद पवार भेटीवर काय म्हणाले राऊत ?.
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?
अजित पवार यांनी शरद पवार यांची दिल्लीत घेतली भेट, काय घडलं नेमके ?.
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.