आंध्रात पुन्हा चंद्राबाबू नायडू सरकार, अबब 35 कोटीचे निवासस्थान, नेटवर्थ 900 कोटीहून अधिक

आंध्रप्रदेशचे मख्यमंत्री चंद्राबाबू यांची प्रतिमा सुरुवातीला देशातील सर्वात हायटेक आणि आय तंत्रज्ञान माहीती असलेल्या नेत्यांमध्ये केली जात होती. त्यांच्यावर मध्यंतरी घोटाळ्याचे आरोप केले गेले. आता चंद्राबाबू पुन्हा एनडीएच्या तंबूत आले आहेत. त्यांच्या आंध्रातील

आंध्रात पुन्हा चंद्राबाबू नायडू सरकार, अबब 35 कोटीचे निवासस्थान, नेटवर्थ 900 कोटीहून अधिक
n.chandrababu naidu and his wife nara bhuvaneshwariImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 4:34 PM

नई दिल्ली : तेलगु देशम ( टीडीपी ) पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी पार्क येथे त्यांचा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सहभाग घेतला. चंद्राबाबू यांची संपत्तीचा विचार करता त्यांचा समावेश श्रीमंत नेत्यांमध्ये केला जातो. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी त्यांची संपत्ती 931 कोटी रुपये दर्शविली आहे.

आंध्र प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये 2024 भाजपाने तेलगु देशम आणि साऊथ सुपर स्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) यांचा पक्ष जनसेना सोबत युती केली होती. या युतीला राज्यात 164 जागा मिळाल्या. त्यात चंद्राबाबूंच्या टीडीपीला 135, जनसेना पार्टीला 21 आणि भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणूकांदरम्यान निवडणूक आयोगाला समोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आंध्रप्रदेशाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यानी संपत्तीचा लेखाजोखा प्रतिज्ञापत्रात दिला आहे., नायडू यांच्याकडे 931 कोटी रुपये स्थावर आणि जंगम संपत्ती आहे. त्यांच्यावर एकूण 10.38 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

5 वर्षांत 39 टक्के संपत्ती वाढली

निवडणूक प्रतिज्ञापत्रात आंध्रप्रदेश नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि तेलुगु देशम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू आणि त्यांची पत्नी नारा भुवनेश्वरी यांच्या संपत्तीत गेल्या 5 वर्षांत जोरदार उसळी आली आहे. या काळात त्यांची संपत्ती 39% टक्क्यांनी वाढली आहे. 2019 मध्ये त्यांच्यजवळ 668 कोटी रुपयांची संपत्ती होती. त्यांची आणि त्यांच्या पत्नी जवळील सध्याच्या जंगम विचार करता उभयतांकडे, चांदीसह 3 कोटीचे रुपयांची ज्वेलरी आहे. चंद्राबाबू केवळ 11,560 रुपयांची रोकड असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे, पत्नीजवळ 28,922 रुपयांची रोख रक्कम आहे.दोघांच्या अनेक बँक अकाऊंट्स मध्ये 13 लाख रुपयांहून अधिक डिपॉझिट्स आहेत.

हे सुद्धा वाचा

शेअरमध्ये संपत्ती मोठी

चंद्राबाबू नायडू यांच्या (Chandrababu Naidu Networth) त्यांच्या संपत्तीत मोठा हिस्सा त्यांच्या पत्नीचे विविध कंपन्यात असलेले स्टॉक होल्डींगचा आहे. चंद्राबाबू नायडू यांचे नॅशनल सेव्हींग स्कीममध्ये 1000 रुपये जमा केले आहेत. तर , त्यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी या हेरिटेज फूड्स कंपनीत मोठ्या समभाग धारक आहेत. 1992 मध्ये हेरिटेज फूड्सची स्‍थापना झाली होती. ही कंपनी शेअर बाजारात लिस्‍टेड आहे. भुवनेश्वरी यांच्याजवळ कंपनीचे 2,26,11,525 शेअर्स आहेत. त्यांची एकूण किंमतच 763 कोटी रुपयांहून अधिक आहे. या शिवाय बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda), Nirvana Holdings Privet, Heritage Finlease Ltd या कंपनीचे शेअर्स आहेत.

हैदराबादमध्ये कोट्यवधीचे घर

आंध्रप्रदेशचे सीएम चंद्राबाबू नायडू यांनी त्यांच्या नावावर एक एंबेसडर कार असून त्याची किंमत 2.20 लाख रुपये सांगितले जाते. त्यांच्या जवळील स्थावर संपत्तीचा विचार करता चंद्राबाबू नायडू यांच्या नावावर कोणतीही शेती योग्य जमिन नाही. परंतू पत्नीच्या नावावर 55 कोटी रुपयांची एग्रीकल्चर जमीन आहे. नायडू यांच्या नावावर 77 लाख रुपयांची नॉन एग्रीकल्चर जमिनीची नोंदणी आहे. याशिवाय हैदराबाद आणि चित्तूरमध्ये दोन लग्झरी घरं आहेत. यात हैदराबादच्या पाली हिल परिसरात असलेल्या आलिशान घराची किंमत सुमारे 35 कोटी रुपये आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.