नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला अर्थसंकल्पात भरघोस निधी, अमळनेर ते एगनवाडी मार्ग पूर्ण होणार
नगर - बीड - परळी रेल्वे मार्गामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना देखील चालना मिळणार असून मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लागणार आहे.
अहमदनगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात 275 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. मध्य रेल्वेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग एकूण 261.25 किलोमीटर लांबीचा आहे. या नगर ते अमळनेर हा 100.18 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झालेला आहे. पुढचा अमळनेर ते एगनवाडी हा 33.12 किलोमीटरचा टप्पा पूर्ण होण्याच्या बेतात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडला असून यात नगर-बीड -परळी रेल्वे मार्गासह बारामती – लोणंद ( 54 कि.मी.), वर्धा- नांदेड ( बरास्ता यवतमाळ- पूसद 270 किमी ) या रेल्वे मार्गासाठी देखील तरदूत केली आहे.
नगर-बीड-परळी नवीन रेल्वे मार्ग मध्य रेल्वेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या क्षेत्रातील हा सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकी हा एक प्रकल्प आहे. 261.25 किलोमीटर लांबीच्या हा प्रकल्प असून त्यापैकी नगर ते अमळनेर हा 100.18 किलोमीटरचा भाग पूर्ण झाला आहे. पुढील टप्पा अमळनेर ते एगनवाडी हा 33.12 किलोमीटरचा असून पूर्ण होण्याच्या बेतात आहे. नगर ते वडवणी हा 200.15 किलोमीटरचा संपूर्ण टप्पा 2024-25पर्यंत तयार होणे अपेक्षित आहे, तर वडवणी ते परळीपर्यंतचा 61.10 किलोमीटरचा उर्वरित भाग 2025-26 पर्यंत तयार होणे अपेक्षित आहे.या मार्गावर 23 स्थानके आहेत. आजपर्यंतचे संपूर्ण काम पुढीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने काम पार पाडले जात आहे.
उत्तम कनेक्टीव्हीटी
आष्टी-अमळनेर या 34 किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन 28 फेब्रुवारी2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या नवीन मार्गावर डेमू ट्रेन सेवेच्या विस्ताराला मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. यापूर्वी अहमदनगर-आष्टी या 66.18 किलोमीटरच्या टप्प्याचे उद्घाटन 23 सप्टेंबर 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्त झाले होते.यावेळी DEMU ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. नगर-बीड-परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 टक्के सहभागातून सुरु आहे. या मार्गावरील DEMU सेवेमुळे अहमदनगर – परळी पट्ट्यातील रहिवाशांना उत्तम कनेक्टीव्हीटी मिळणार आहे.
असा पूर्ण झाला आतापर्यंतचा प्रवास
•अहमदनगर-नारायणडोह – 12.27 किमी 29.03.2017 रोजी सुरु
• नारायणडोह-सोलापूरवाड – 23.26 किमी 25.02.2019 रोजी सुरु
• सोलापूरवाडी-आष्टी – 31.12.2021 रोजी 30.64 किमी.
• आष्टी-अमळनेर – 05.01.2024 रोजी 33.92 किमी.
• बारामती – लोणंद ( 54 कि.मी.) – 710 कोटी – 330 कोटी ( बजेट 2024-25 )
• वर्धा- नांदेड ( बरास्ता यवतमाळ- पूसद 270 किमी ) – 2598 कोटी – 450 कोटी ( बजेट 2024-25 )