नागपुरात बेरोजगारांची दुप्पट रकमेचं आमिष दाखवून फसवणूक, 70 कोटींचा घोटाळा?; आठ जणांना अटक

नागपूरसह इतर राज्यात लोकांना मोठ्या व्याजाचं आमिष दाखवून एक कंपनी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा वाढत होती.

नागपुरात बेरोजगारांची दुप्पट रकमेचं आमिष दाखवून फसवणूक, 70 कोटींचा घोटाळा?; आठ जणांना अटक
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 5:37 PM

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात रोजगार बुडालेल्यांना मोठ्या व्याजाचं आणि रक्कम दुप्पट करुन देण्याचं (Nagpur 70 Crore Scam) आमिष दाखवून एका कंपनीने नागरिकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनीच या घोटाळ्याचा पर्दाफाश केला असून अधिक तपास करत आहेत (Nagpur 70 Crore Scam).

नागपूरसह इतर राज्यात लोकांना मोठ्या व्याजाचं आमिष दाखवून एक कंपनी लॉकडाऊनच्या काळात सुद्धा वाढत होती. त्याला प्रतिसाद चांगला मिळत असल्याने त्याने वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून फसवणुकीचा उघडला होता. मेट्रो व्हिजन बिल्डकॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ‘रियल ट्रेंड’ नावाची योजना लॉकडाऊनच्या काळातही यशाचे नवे शिखर गाठत होती.

मेट्रो व्हिजन बिल्डकॉन इंडियाचा मुख्य प्रोमोटर विजय गुरनुले 2015 पासून ही कंपनी चालवत आहे. मात्र, वेगवेगळ्या व्यवसायात हात आजमावणाऱ्या विजय गुरनुले याने एप्रिल 2020 मध्ये रियल ट्रेंड नावाने गुंतवणुकीची योजना आणली. या योजनेत वार्षिक किंवा मासिक नव्हे तर दर आठवड्याला परतावा मिळणार होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात विविध कामधंदे ठप्प झालेले लोक मोठ्या संख्येने या योजनेकडे आकर्षित झाले. मात्र, त्यांची फसवणूक झाली आणि प्रकरण पोलिसांकडे आलं. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक सुद्धा केली (Nagpur 70 Crore Scam).

काय होती रियल ट्रेंड योजना

– गुंतवणूकदाराने ठराविक रक्कम गुंतविल्यास त्याला निश्चित रकमेचा परतावा दर आठवड्याला मिळेल.

– दर आठवड्याला परतवा मिळत असल्याने गुंतवलेली रक्कम ३ ते ४ महिन्यात दुप्पट होईल.

– रियल ट्रेंड योजनेत 7 उपप्रकार होते.

– 9 हजार गुंतविल्यास दर आठवड्याला 750 परतावा

– या शिवाय मल्टीलेव्हल मार्केटिंग प्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने आणखी गुंतवणूकदार आणले तर त्याला कमिशन मिळणार होतं.

कमी मुदतीत भरमसाठ परतावा येणार असल्याची हमी असल्याने लॉकडाऊनमध्ये घरी बसलेल्या लोकांनी या योजनेत अधिकाधिक रक्कम गुंतवली. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी झूम मीटिंग घेऊन लोकांना लॉकडाऊन संपता संपताच तुम्ही श्रीमंत व्हाल असे स्वप्न दाखविले. जास्त गुंतवणूकदार आणणाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. पाहता पाहता कंपनीला 13 हजार प्राथमिक आणि त्यांच्या माध्यमातून 1 लाख 27 हजार इतर गुंतवणूकदार मिळाले. आतापर्यंत पोलिसांच्या तपासात 1 लाख 27 हजार गुंतवणूकदार असल्याचे निष्पन्न झाले असून हा घोटाळा तब्बल 70 कोटींच्यावर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा सगळा प्रकार उघड करणाऱ्या पोलिसांचं गृहमंत्र्यांनी अभिनंदन सुद्धा केलं आहे.

Nagpur 70 Crore Scam

संबंधित बातम्या :

ड्रग्ज पेडलर्सचं डेअरिंग वाढलं, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला

तिघांचा गळफास, चौथा फास कुणासाठी?, अफवा थांबवा, अन्यथा गुन्हे दाखल करु; पोलिसांचा इशारा

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.