नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद यांसह इतर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपुरात 51 वर्षावरील वय असणाऱ्या सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वयाची पन्नाशी ओलांडलेल्या नागरिकांना धोक्याचा इशारा असल्याचे पाहायला मिळत आहे. (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high)
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यात 51 वर्षांवरील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात पहिल्या लाटेत 51 वर्षांवरील 2 हजार 458 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 77 टक्के रुग्ण हे 51 वर्षांवरील आहेत.
दरम्यान 51 वर्षांवरील मृत्यूची संख्या ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात जास्त आहे. नागपूर शहरात 1426 पुरुष, 586 महिला तर ग्रामीणमध्ये 321 पुरुष आणि 125 महिलांचा मृत्यू झाला आहे. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अनेकांना रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि इतर सहव्याधी राहतात. यामुळे कोरोनावरील उपचारास योग्य प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
नागपुरात आतापर्यंत 1 लाख 16 हजार 606 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 08 हजार 965 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 3014 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 4 हजार 585 कोरोना रुग्ण सक्रीय आहेत. (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high)
दरम्यान महाराष्ट्रात काल (6 डिसेंबर) 4 हजार 757 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल दिवसभरात 40 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 18 लाख 52 हजार 266 इतका झाला आहे. तर 47 हजार 734 कोरोनाबाधित मृत्यू झाले आहेत. सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 2.58 टक्के इतका आहे.
तर महाराष्ट्रात काल 7 हजार 486 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा एकूण आकडा हा 17 लाख 23 हजार 370 इतका झाला आहे.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 73 हजार 705 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 52 हजार 266 (16.43 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 56 हजार 085 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 5 हजार 903 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Nagpur Above 51 age Corona Patient Death rate high)
Today, newly 4757 patients have been tested as positive in the state. Also newly 7486 patients have been cured today. Totally 1723370 patients are cured & discharged from the hospitals. Total Active patients are 80079. The patient recovery rate in the state is 93.08%.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 6, 2020
संबंधित बातम्या :
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हजारो अनुयायांची पत्राद्वारे भावनिक साद!