आता चालता-फिरता कुठेही पाणी शुद्ध करा, नागपूरच्या तरुणाचा नवा शोध
अशुद्ध पाण्यामुळं होणारे आजार टाळण्यासाठी अनेकजण घरी वॉटर फिल्टर (nagpur boy launch new water filter) लावतात.
नागपूर : अशुद्ध पाण्यामुळं होणारे आजार टाळण्यासाठी अनेकजण घरी वॉटर फिल्टर (nagpur boy launch new water filter) लावतात. मात्र, हजारोंची किंमत असल्यानं सामान्य नागरिकांना ते घरी लावणं परवडणारं नसतं. तसंच आपण घराबाहेर असल्यावर आपल्याला शुद्ध पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असलेल्या नदीम खान या युवा संशोधकानं नैसर्गिक पद्धतीनं पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे. हे जगातील सर्वात लहान वॉटर फिल्टर असल्याचा दावा (nagpur boy launch new water filter) त्यांने केला आहे.
घराबाहेर मिळणारं पिण्याचं पाणी शंभर टक्के शुद्ध असेल याची खात्री देता येत नाही. अनेकदा बाहेरचं पाणी पिऊन तहान भागवावी लागते. मात्र, पाणी शुद्ध नसल्यास आरोग्याच्या समस्यांनाही तोंड देण्याची वेळ येऊ शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन नागपूरचा युवा संशोधक नदीम खान यानं सर्वांना परवडणारं आणि अशुद्ध पाणी शुद्ध करून ते पिण्यायोग्य करणारं, खिशात मावेल अशा “ब्ल्यू मिनरल वॉटर फिल्टर’चा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, याची विविध स्तरांवर चाचणी झाली असून इंडियन स्टॅण्डर्ड असोसिएशनने याला प्रमाणित केलं आहे.
गोंदिया, गडचिरोलीचा भाग नक्षलग्रस्त आहे. येथे जवानांच्या तुकड्या चार-पाच दिवस जंगलात गस्तीवर असतात. नाइलाजानं त्यांना नदी-नाल्याचं अशुद्ध पाणी प्यावं लागतं. मात्र, नदीमनं विकसित केलेले “ब्ल्यू मिनरल’ वापरून हे जवान शुद्ध पाणी मिळवू शकतात. तसंच शाळा, महाविद्यालये किंवा प्रवासात चालता फिरता प्रत्येक वेळी फिल्टरचं पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. त्यासाठी हे वॉटर फिल्टर उपयोगी आहे.
कुठल्याही बाटलीला फिट होईल, असं हे यंत्र आहे. बाटलीत कुठलंही पाणी घेऊन हे यंत्र बाटलीच्या समोर लावायचं. बाटलीतून पाणी ग्लासमध्ये घेतल्यावर ते शुद्ध स्वरूपात मिळतं. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्यांना नदीम हे यंत्र मोफत देतो. गरीबांना शुद्ध पाणी मिळावं, हाच नदीमचा यामागचा उद्देश आहे.