समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित समजून वागाल, तरच वाचाल, तुकाराम मुंढेंनी रामबाण उपाय सांगितला!

समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे,असं समजून आपण खबरदारी घ्या, असा रामबाण उपाय तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. (Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित समजून वागाल, तरच वाचाल, तुकाराम मुंढेंनी रामबाण उपाय सांगितला!
Follow us
| Updated on: Jul 22, 2020 | 2:37 PM

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना लढ्याविरोधात रामबाण उपाय सांगितला आहे. “जर कोरोना रोखायचा असेल तर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असं समजून आपण खबरदारी घेणे. जर तसे नियम पाळले तर आणि तरच कोरोनाला दूर ठेवू शकतो” असं तुकाराम मुंढे म्हणाले. (Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

तुकाराम मुंढे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन कोरोना स्थितीची माहिती दिली. “कोरोनाच्याबाबतीत नागपूरची स्थिती नियंत्रित आहे असं म्हणता येणार नाही. स्वत:ला, कुटुंबाला आणि समाजाला वाचवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना थांबण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे समोरच्या प्रत्येक व्यक्तीला कोरोना आहे, असं समजूनच आता राहिलं पाहिजे”. (Tukaram Mundhes advice to Nagpurkars)

अनलॉकिंगनंतर कोरोना रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण वाढले आहे. लोक नियम पाळत नाहीत, त्यामुळे रुग्ण वाढतात. लोक आजाराची माहिती लपवतात, त्यामुळे मृत्यू वाढले. मी दोन तासांत चार लाखांचा दंड वसूल केला. वेळ आली तर मी फक्त लॉकडाऊन करणार नाही, सोबत कर्फ्यू लावेन. आजच्या स्पीडने नागपुरात कोरोना रुग्ण वाढले, तर नागपुरात 10 हजारापेक्षा जास्त रुग्ण व्हायला वेळ लागणार नाही, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

नागपूरात लॉकडाऊन करायचं असल्यास 14 ते 15 दिवसांचं करणार, सोबत कर्फ्यू असेल. लॉकडाऊन करण्यापूर्वी २-३ दिवस आधी लोकांना कळवण्यात येईल. लॉकडाऊन असेल तर बाहेर पडता येणार नाही, असं तुकाराम मुंढे यांनी ठणकावलं.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

नागरिक नियम पाळत नाहीत, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढललेली आहे. याशिवाय मृत्यूदेखील वाढला आहे. मृत्यूमागील कारण म्हणजे लोक आपल्या आजारपणाविषयी माहिती देत नाहीत. ते लपवून ठेवतात. मृत्यूदर कमी करायचा असेल तर जे कुणी आजारी असतील त्यांनी डॉक्टराला दाखवून निदान करुन घ्यायचं. मात्र, नागरिक प्रामाणिकपणे नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. जे नागरिक आजारी आहेत, ज्यांना ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होतोय त्यांनी स्वत:हून तपासून घेणं जरुरीचं आहे.

लॉकडऊनमध्ये शिथिलता ही आपल्या जीवनाश्यक वस्तूंचा विचार करुन तसेच अर्थव्यवस्थेचा विचार करुन देण्यात आली आहे. या शिथिलतेची नियमवाली आहे. नागरिकांनी ही नियमावली पाळली पाहिजे. दुकानांमध्ये फक्त पाच लोकांना परवानगी आहे. मात्र, पाच ऐवजी दहा जण असल्याचं मी स्वत: बघितलं. फुटपाथवर गर्दी होते. ऑटो रिक्षाला परवानगी नाही, पण तरीही सर्रास सुरु आहेत. दुचाकीवर एकालाच परवानगी असताना दोन ते तीन जण एकाच दुचाकीवर जातात. मास्क वापरलं जात नाही. चारचाकी गाड्यांमध्ये ड्रायव्हर वगळता दोन जणांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाच ते सहा लोक चारचाकीतून प्रवास करत असल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या 

नागपूर आयुक्त तुकाराम मुंढेंपाठोपाठ महापौरही रस्त्यावर, नियम तोडणाऱ्यांचा फैसला ‘ऑन द स्पॉट’    

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन दुकानांवर कारवाई, पीपीई किट घालून थेट कोरोना वॉर्डात 

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.