नागपुरात पठ्ठ्या कोरोनावर मात करुन घरी आला, आईकडून नजर उतरवून, औक्षण करुन गृहप्रवेश

नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण बरा (Nagpur corona patient discharge ) होऊन काल गुरुवारी 26 मार्चला घरी परतला.

नागपुरात पठ्ठ्या कोरोनावर मात करुन घरी आला, आईकडून नजर उतरवून, औक्षण करुन गृहप्रवेश
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 2:07 PM

नागपूर : नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण बरा (Nagpur corona patient discharge ) होऊन काल गुरुवारी 26 मार्चला घरी परतला. यावेळी त्याच्या घरी त्याच्या आईने त्याची नजर उतरवली. तसंच त्याला ओवाळून, औक्षण करुन स्वागत केलं. अमेरिकेवरुन आलेल्या या रुग्णाला कोरोनाची लागण (Nagpur corona patient discharge ) झाली होती. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या त्याची पत्नी, मावस भाऊ आणि मित्रालाही कोरोना लागण झाली. या पहिल्या रुग्णाच्या तीन टेस्ट निगेटिव्ह आल्यावर डॉक्टरांनी त्याला बरं झाल्याचा निर्वाळा देत, रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र पुढील आणखी काही दिवस त्याला होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

नागपुरात चार नवे रुग्ण दरम्यान, नागपुरात आज चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. 18 तारखेला दिल्लीहून आलेल्या व्यक्तीला काल कोरोना संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात चार व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह निघाले. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 9 वर गेली आहे. त्यामुळं नागरिकांनी घराबाहेर पडणं टाळावं यासाठी प्रशासनानं हे शीघ्र कृती दल तयार केलेत.

यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाने नागपूर शहरातील 38 वॉर्डात प्रत्येकी एक असे एकूण 38 शीघ्र कृती दल तयार केले आहेत. नागरिकांकडे काही टोल फ्री नंबर देण्यात येणार आहे. नागरिकांना कुठलीही अडचण असल्यास किंवा आरोग्यासंबंधी अडचण वाटत असल्यास त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तात्काळ मदत केली जाणार आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांचा वाढता आकडा

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विदर्भात आज ‘कोरोना’चे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागपुरात काल सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना लागण झाली आहे. तर गोंदियातही एक जण कोरोनाग्रस्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 136 वर गेला आहे. (Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 51 पुणे – 20 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 11 नागपूर – 9 कल्याण – 5 ठाणे – 5 नवी मुंबई – 5 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 कोल्हापूर – 2 गोंदिया – 1 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1

एकूण 136

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च नागपूर (1) – 26 मार्च सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च सांगली (3) – 26 मार्च पुणे (1) – 26 मार्च कोल्हापूर (2) – 26 मार्च नागपूर (4) – 27 मार्च गोंदिया (1) – 27 मार्च

एकूण – 136 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च

 संबंधित बातम्या 

यकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण 

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.